पान:वाचन.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय
भाग ८ वा

वाङ्मय

वाड्मय हा शब्द जरी लहान आहे, तथापि या शब्दाची व्यापकता अति मोठी आहे. वाङ्मय ही संज्ञा काव्य, कादंबऱ्या, नाटकें, सुरस व मार्मिक निबंध, इतिहास, चरित्रें, टीकात्मक लेख, इत्यादि विषयांसच साधारणतः लावण्यांत येत असते. कित्येक लोक वाङ्मयांत शास्त्रांचाही समावेश करितात. परंतु शास्त्रे अनेक असून त्यांचा विस्तारही प्रचंड असल्यामुळे शास्त्र आणि वाङ्मय हीं निरनिराळीं समजणें बरें. प्रत्येक राष्ट्राच्या वाङ्मयावरून त्या लोकांची प्रगति, अवनति, त्यांच्या रीतिभाती, त्यांचे आचारविचार वगैरे अनेक गोष्टी आपणास सहज कळून येतात. आरशांत पडलेलें प्रतिबिंब पाहून तें ज्या पदार्थांचें असेल त्या पदार्थाविषय दृश्य तेवढ्या गोष्टी आपणास सांगतां येतात, तद्वत् वाङ्मय हा एक आरसा असून ह्या आर- शांत ती भाषा बोलणाऱ्या लोकांचे अंतरंग व बहिरंग हीं स्पष्ट दिसून येतात. दोनहजार वर्षांपूर्वी सुधारणेच्या शिखरी पोहोंच- लेली ग्रीक व रोमन राष्ट्रे नामशेष झाल्यास आज किती तरी शतके झाली असूनही त्यांचें जें वाङ्मय उपलब्ध आहे, त्यावरून ते लोक कसे होते, त्यांचे आचारविचार कसे होते, याची आपणांस सहज कल्पना करतां येते.
फार लांब कशाला ? आर्य लोक हे जगांत अत्यंत प्राचीन लोक असून प्राचीन कालापासून त्यांच्या आचारविचारांत जो फरक होत गेला आहे, वेळोवेळी त्यांनीं जें ज्ञान संपादन केलें आहे, तें सर्व आज कायम आहे; याचे कारण त्यांचे वाङ्मय