पान:वाचन.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
वाचन.

ऐकिलेंस, असे त्याचा बाप त्यास नित्य विचारी. प्रारंभी त्यास ठळक ठळक गोष्टींसुद्धां ध्यानांत ठेवून सांगतां येत नसत. परंतु पुढे देवळांतील भाषणे मोठ्या काळजीनें ध्यानांत ठेवून बापाने विचारल्यावर तो ती त्यास सांगूं लागला. अशा रीतीनें त्यास लक्षपूर्वक ऐकण्याची संवय लागून त्याची स्मरणशक्ति इतकी वाढली की, मंदिरांत ऐकिलेली व्याख्यानें तो जणूं काय पाठ क्षणून दाखवूं लागला ! सारांश, वाचलेल्या किंवा ऐकि- लेल्या गोष्टी लिहून काढल्या असतां किंवा त्यांविषयीं वादवि वाद केला असतां, त्या बऱ्याच ध्यानांत राहतात, असा अनु- भव आहे.

 स्मरणशक्ति ही मनुष्याच्या स्वराप्रमाणे आहे. स्वभावतःच जसा कित्येक मनुष्यांचा स्वर मधुर असतो व पुढे अभ्यास heart 'अधिकस्य अधिकं फलम् ' या उक्तीप्रमाणें तो उत्तम होतो, तद्वत् कित्येकांची स्मरणशक्ति लहानपणापासूनच अधिक असते; अशा लोकांनी प्रयत्न केल्यास ते एकपाठी निघतील किंवा शतावधानी होतील यांत तें नवल काय ? विक्रम राजाच्या पदरी एकपाठी कवि असून त्यांच्यासमोर कोणीं कविता झणून दाखविली कीं, ते ती कविता जुनीच आहे असें ह्मणत व प्रत्यंतराकरितां बिनचूक पाठ हाणून दाखवीत. सिनेकानें एके ठिकाणी लिहिलें आहे कीं, अथेन्स शहरांत पूर्वी एक सेनापति असे. त्याची स्मरणशक्ति फार विलक्षण असे. त्यांच्या हाता- खाली असलेल्या अडीच तीन हजार शिपायांचीं नांवें त्याच्या अगदी मुखोद्गत असत. अशी विलक्षण स्मरणशक्ति फारच थोड्या लोकांस असते. परंतु स्मरणशक्ति कशी वाढवावी यावि- षयी थोडक्यांत जें वर सांगितलें आहे, तें वाचकांनी ध्यानांत बाळगून त्याप्रमाणे वाचण्याचा प्रयत्न केला असतां, त्यांना विशेष फायदा होईल व अल्प प्रयासाने बन्याच गोष्टी त्यांच्या चांगल्या ध्यानांत राहत जातील.