Jump to content

पान:वाचन.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचनाची अभिरुचि.

५३

हातीं घेतलेला असतो तो त्यांस समजत नाही आणि ज्या विषयाची तंद्री लागलेली असते, जोही, त्यांना पुरता कळत नाहीं. सारांश, 'इदंच नास्ति ते अशी त्यांची स्थिति होते. शून्यवृत्ति ही एक मानसिक महाव्याधि आहे. ती जडली असतां मनुष्य डोळे असून आंधळा होतो; कान असून बहिरा होतो; त्याची विचारशक्ति, स्मरणशक्ति वगैरे सर्व शक्ति नाहीशा होतात ! सारांश, शून्यवृत्ति हैं एक प्रकारचें वेडच आहे, असें हाटलें असतां फारसें गैरवाजवी होणार नाहीं. याकरितां ही व्याधि जडूं न देण्याविषयीं प्रत्येकाने फार खबरदारी घेतली पाहिजे. एकदां जडली की, ती हळूहळू वाढत जाते आणि पुढें मनुष्य अगदी कुचकामाचा होतो !
 कोणतीही गोष्ट ध्यानांत राहण्यास तिजकडे चांगले लक्ष दिले पाहिजे. लक्ष न दिलें तर ती ध्यानांत बरोबर राहत नाहीं. एखाद्या भिंतीवर असंख्य चित्रे काढलेली असून ती आपण पाहूं लागलों, तर त्या चित्रांपैकीं ज्या चित्रांकडे आपले लक्ष विशेष वेधलें जाईल, तींच आपल्या ध्यानांत राहतील. इतर आपल्या ध्यानांत रहाणार नाहींत इतकेंच नाहीं तर, तीं आपण पाहिली कीं नाहीं, याची आपणास आठवणसुद्धां राह- णार नाहीं. लक्ष नसलें ह्मणजे आपल्याशी कोण बोलत आहे, आपण कोणीकडे पाहत आहों, आपल्या सभोवती काय चाललें आहे, हैं मनुष्यास कांहींच कळत नाहीं. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक पाहण्याचा निश्चय केला असतां प्रथम अंमळसे श्रम पडतात; परंतु पुढें तशीच संवय होते. एकाग्र मनानें कोणत्याही विष- याचें परिशीलन झालें असतां, तो थोडक्या काळांत चांगला समजतो व ध्यानांत सहज राहतो. आंधळ्यास स्मरणशक्ति विशेष असते, याचें कारण हैं कीं, त्याच्या मनाची एकाता