पान:वाचन.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
वाचन.

विशेष असते. ब्रूटसविषय असे सांगतात की, ज्या लढाईवर सर्वज्ञात पृथ्वी स्वामित्व अवलंबून होते, अशा फारसेलिया येथील लढाईच्या आदल्या रात्री तो आपल्या तंबूत पुस्तक वाचीत व लेखणीनें त्यावर खुणा करीत स्वस्थ बसला होता ! यावरून त्याच्या मनाची एकाग्रता केवढी होती, याचा वाचकां- नीच विचार करावा ! सारांश, एकाग्र मनानें जें कांहीं तुही कराल, 'तुमच्या चांगलें ध्यानांत राहील.
 विचाराने विचार वाढतात. ज्या गोष्टींत प्रथम आपली मति चालत नाहीं, त्याच गोष्टींविषयीं आपण विचार करूं लागलों की, त्या आपणास सहज कळतात. त्यांचा कार्यकारणभाव समजतो. विचारशक्तीस घर्षण होत गेल्यानें ती तीत्र होते व मग लहानसहान गोष्टीसुद्धां बिनचूक आपल्या ध्यानांत राहतात. मन हैं लोखंडासारखे असून विचारांच्या योगानें तें चकचकित किंवा तरतरित राहते. विचार कमी पडले कीं, तें तेव्हांच गंजून जाते. दुसऱ्यांच्या विचारावर किंवा सल्लामसलतीवर अवलंबून राहणे, हें दुर्बलतेचें चिन्ह होय, प्रत्येक मनुष्याने स्वतः विचार करून बरेवाईट हुडकून काढून आपले मत ठाम ठरविलें पाहिजे, आपले पूर्वज श्रुतिस्मृतीसारखे मोठमोठाले ग्रंथ पाठ करीत असत. होमर कवीचे समग्र ग्रंथ पाठ ह्मणून दाखविणारे लोक ग्रीस देशांत होते. संवयीच्या योगानें पाठ करण्याची शक्ति वाढते. जे श्लोक पाठ करण्यास प्रथम तासाचे तास लागतात, तेच पुढे पुढें सहज पाठ होतात. लहान वयांत थोडे पाठांतर करणें बरें, परंतु पाठ करण्याचा बोजा मनावर फार पडता कामा नये. त्यामुळे मेंदूवर अति श्रम पडून तो बिघडतो, एकाच वेळी एका दमांत पाठ करून मेंदूस श्रमविण्यापेक्षां पुनः पुनः लक्षपूर्वक एकाम चित्ताने