पान:वाचन.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्मरणशक्ति व ती वाढवावी कशी.

५१

तरी पण मनुष्याने प्रयत्न केल्यास त्यास आपली स्मरणशक्ति बरीच वाढवितां येते. अष्टावधानी, शतावधानी या लोकांची स्मरणशक्ति जरी जन्मतः अधिक असली, तरी स्वप्रयत्नानें ते ती पुढे वाढ- वितात आणि त्याचमुळे साधारण लोकांस ते आपल्या अलौ- किक स्मरणशक्तीच्या योगानें अगदी थक्क करून सोडितात. स्मरणशक्ति वाढविणें हें काम फार कठीण व महत् प्रयासाचे आहे. तें एकदोन दिवसांत किंवा महिन्या दोन महिन्यांत साध्य होण्यासारखे नसून त्याकरितां वर्षानुवर्षे खपलें पाहिजे. आपणास ज्या संवयी लागल्या असतील त्या समूळ नाहीशा करून त्या जागी नवीन संवयी लाविल्या पाहिजेत. जुन्या संवयस फाटा देऊन नवीन लावणें हें काम किती कठीण आहे, हैं आमच्या वाचकांच्या पूर्ण अनुभवास आलंच असेल. विषय येथे जास्त लिहिण्याची आवश्यकता नाहीं.
 स्मरणशक्ति हैं विचाराचे कोठार आहे हाणून पूर्वी सांगि तलेच आहे. कोठारांत तऱ्हेतऱ्हेच्या लहान मोठ्या अनेक वस्तु ठेवणें असल्यास त्यांचे वर्गीकरण करून त्या शिस्तवार ठेविल्या पाहिजेत व त्या वारंवार पाहिल्या पाहिजेत. झणजे कोणती वस्तु कोठें आहे, हें वेळेवर सहज चटकन् सांगतां येईल. त्याचप्रमाणे विचारांचं आहे. जें जें आपण ऐकतों किंवा पाहतों, तें प्रथम लक्षपूर्वक मनन करून ध्यानांत ठेविलें पाहिजे. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक व शांतपणे समजून घेणें झणजे अर्धेअधिक काम झाल्यासारखे आहे. पुष्कळ लोकांची चूक होते ती या ठिकाणींच. ते कोणतीही गोष्ट बरोबर पाहता नाहींत, ऐकत नाहींत अथवा तीविषयीं फारसा विचारही करीत नाहींत, यामुळे ती त्यांस बरोबर समजत नाहीं किंवा ती त्यांच्या ध्यानांतही बरोबर राहत नाहीं. जें जें तुझी पहाल