पान:वाचन.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
वाचनं.

 आपण जी गोष्ट एकदां पाहिली असेल किंवा ऐकिली असेल, ती आपणास पुढे पाहिजे त्या वेळी ज्या शक्तीच्या योगानें पुनः ध्यानांत आणतां येते, त्या शक्तीस स्मरणशक्ति असें ह्मणतात. पशुपक्षी इत्यादि प्राण्यांस स्मरणशक्ति अत्यल्प आहे. ती मनुष्याच्याच ठिकाणी परमेश्वरानें अधिक ठेविली आहे. सृष्टि- क्रमांत मनुष्यप्राणी ईश्वराच्या खालोखाल असून तो जगांतील सर्व वस्तूंवर व प्राणीमात्रांवर आपला पूर्ण अंमल गाजवीत आहे; याचें कारण हें कीं, जगन्नियंत्यानें त्यास बुद्धि व स्मरणशक्ति या दोन अमोल देणग्या दिल्या आहेत. जेवढी बुद्धीची उपयुक्तता आहे, तेवढीच स्मरणशक्तीचीही आहे. बुद्धीच्यायोगाने मनुष्यास ज्ञान प्राप्त होतें, आणि स्मरणशक्तीच्या- योगार्ने तें त्यास सुरक्षित सांठवून ठेवितां येतें. स्मरणशक्तीस कोठाराची उपमा देण्यांत येते, ती वास्तविक पाहतां बरोबर नाहीं. कोठारास कसला तरी आकार असून अमुक एक मण किंवा खंडी इतकाच माल त्यांत राहील, जास्त राहणार नाहीं. तसे स्मरणशक्तीचें नाहीं. विचार हे जड पदार्थ नसल्यामुळे ते सांठविण्याचे कोठार जी स्मरणशक्ति तीस आकार नाहीं आणि जडत्वही नाहीं. मेंदूसारख्या लहानशा जागेंत जरी तिचा समा- वेश आहे, तरी तिची व्यापकता इतकी आहे कीं, मनुष्यानें आजन्म किती जरी ज्ञानाच्या राशीच्याराशी मिळविल्या तरी त्या सगळ्यांचा तीत समावेश होऊन आणखी जागा नेहमी रिकामी असावयाचीच, ज्ञान सांठविण्यास स्मरणशक्तींत जागा शिल्लक नाहीं, अशी गोष्ट कधीं घडून आली असेल, ता मुळींच संभवत नाहीं.
 स्मरणशक्ति सर्वास सारखी असते असें नाहीं. कोणाच्या ठिकाणी ती जास्त असते व कोणाच्या ठिकाणी ती कमी असते.