पान:वाचन.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचावे कसें.

३५

असे. ते स्वयंप्रकाशित असून परप्रकाशाचा त्यांच्या आंगी फारच थोडा अंश असे. लोहाराचा हात, डांकवाल्याचा दम, कारकु. नाची मांडी, हीं जशीं संवयींच्या योगानें घट्ट होतात; तसेंच बुद्धीचेंही आहे. विचाराच्या योगानें ती बळकट होऊन तिला . सोज्वलता प्राप्त होते.
 नुसतीं भाराभर पुस्तकें वाचण्यांत कांहीं अर्थ नाहीं. जे भाराभर पुस्तकें वाचतात, त्यांचे विचार अगदी उथळ असून त्यांची बुद्धि क्वचित्च खोल असते. 'पुढे पाठ आणि मागें सपाट' अशी त्यांची स्थिति होते. एका प्रसिद्ध फ्रेंच ग्रंथकारा- पाशी फारच थोडा पुस्तकसंग्रह असल्याबद्दल कोणी त्यास हांसलें; तेव्हां त्यानें उत्तर दिलें कीं, 'जेव्हां पुस्तकाची मला जरूर लागते, जेव्हां मी तें तयार करितों.' सर्व हिंदुस्थानांत ज्याच्या विद्वत्तेची ख्याति आहे, अशा एका विद्वान् गृहस्थाच्या घरीं एक लेखक गेला असतां, तेथें त्यांस सरासरी वीस पंचवीसच पुस्तकें दिसली ! यावरून उघड आहे की पुस्तकें थोडी वाचली असतां पुरेशी होणार आहेत. परंतु तीं सावकाश आणि विचार- पूर्वक वाचली पाहिजेत आणि जेणेंकरून त्यांतील पुष्कळ भाग आपल्या ध्यानांत राहील अशी काळजी घेतली पाहिजे.

 पुस्तक वाचण्यास हाती घेण्यापूर्वी तें कोणत्या विषयासंबंधीं आहे, त्याचा कर्ता कोण आहे, हें पहावें, तसेंच नांवास अनुस- रून पुस्तकांत विषय प्रतिपादन केलेलें आहे कीं नाहीं, हेंही पहावें. कधीं कधीं नांव भलतेच आणि आंतील विषय भलताच, असेंही आढळून येतें. नंतर प्रस्तावना वाचून पहावी.


  • पूर्ण ग्रंथ पाहिल्यावीण । उगाच ठेवी जो दूषण ॥

तो दुरात्मा दुरभिभानी । मत्सर करी ॥

रामदास.