पान:वाचन.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
वाचन.

तर होत नाहींच, बिघडून आमांश होईल. त्याचप्रमाणे वाचनाचें आहे. आपले मन जोपर्यंत शांत असून वाचनापासून त्याला कंटाळा येत नाहीं, तोंपर्यंतच वाचन चांगलें. परंतु मन व्यग्र होऊन कंटाळवाणे झाल्यावर वाचलें असतां त्यापासून फायदा परंतु उलट मेंदूस पुष्कळ त्रास मात्र होतो. असाच क्रम कांहीं दिवस चालू असल्यावर मेंदू बिघडून त्याचा स्मरणशक्तीवर अनिष्ट परिणाम होतो ! ' खादाडाला चव नाहीं' अशी एक ह्मण आपणांत आहे; त्याचप्रमाणे अति वाचणाराला शब्दसौष्टव, विचारसौंदर्य, शब्दमाधुर्य हीं फारच थोडीं कळतात.भाराभर अति वाचर्णे चांगलें नसून तें मननपूर्वक बेताचेंच असणें बरें.

 हल्लीं शेंकडों पुस्तकें दरवर्षी छापून प्रसिद्ध होतात. मोठ- मोठ्या पुस्तकालयांत वाचण्याकरितां हजारों पुस्तकें ठेविलेली असतात. शाळा, पाठशाळा, शहरोशहरी स्थापन होऊन विद्येचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. खरी विद्येची अभिरुचि ज्याला असेल, त्याला पूर्वीपेक्षां हल्लीं कितीतरी अधिक सोयी झाल्या आहेत. अशी स्थिति असून थ्युसिडायडीससारखे इति- हासकार, होमर, व्हार्जिल यांसारखे कवि, आरिस्टाटल व प्लेटो यांसारखे तत्ववेत्ते हल्लीं कां निपजूं नयेत ? या पूर्वीच्या लो- कांना फारशा सोयी नव्हत्या. फार तर काय, त्यांना ग्रंथसुद्धां फारसे अवलोकन करण्यास मिळत नसत ! आणि असें असून ते एवढे विद्वान् कसे ? याचें कारण हेंच कीं, ते मोठ्या आस्थेनें शिकत असत. ग्रंथांचा अभ्यास ते फारच मन लावून करीत असून कोणत्या ग्रंथांत काय लिहिलें हें त्यांस अगदीं मुखोद्गत करणें भाग पडे. हल्लींप्रमाणें त्यांची विद्या केवळ पुस्तकी नव्हती. ते जें कांहीं थोडें शिकत, त्यावर ते पुष्कळ विचार करीत असत. त्यामुळे त्याच्या बुद्धीचें पोषण होऊन ती विशाल होत