पान:वाचन.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचावें कसें.
भाग ५ वा.

वाचावे कसे ?

मागील भागांत पुस्तकांचें पुष्कळ वर्णन करण्यांत आलें आहे. पुस्तकें वाचावी कशीं, ही गोष्ट चांगल्या रीतीनें समजाऊन घेऊन नंतर ती वाचलीं असतां त्यापासून फायदा होतो. परंतु या गोष्टीकडे बहुधा कोणी फारसे लक्ष देत नाहींत. पुस्तक हाती पडलें ह्मणजे तें कसें तरी वाचून एकदांचं संपवून टाकले हणजे झाले. नवीन पुस्तक पाहिलें हाणजे तें वाचण्यास प्रथम कित्येकांना फार उत्सुकता वाटते. परंतु ती उत्सुकता लवकरच नाहींशी होऊन पांचपंचवीस पाने वाचलीं ह्मणजे त्यांना अगदीं कंटाळवाणें होतें. अर्धेच पुस्तक वाचून ते टाकून देतात किंवा आपणावर हैं एक मोठें ओझें येऊन पडलें आहे, असें समजून मोठ्या कष्टानें ते पुस्तक कसेबसें तरी संपवितात. अशा रीतीनें पुस्तकें वाचण्यापेक्षां तीं न वाचलेलीं बरौं. त्यापासून वाचणारांस फायदा तर होत नाहींच, परंतु उलट वाचनाचे श्रम होऊन जीव मात्र अगदी कंटाळवाणा होतो. पुस्तकें वाचतेवेळीं मुळींच कंटाळा न येतां मनास करमणूक कशी होईल, भाराभर पुस्तकें न वाचतां थोड्या पुस्तकांपासून अल्पकाळांत आपणास पुष्कळ ज्ञान कसे करून घेतां येईल, हैं या भागांत समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
 अन्न पचन होण्यास तें बेताचेंच खाल्लें पाहिजे; तें सावकाश खाऊन त्याचें चांगलें चर्वण झाले पाहिजे, ह्मणजे तें पचतें. परंतु तेंच अन्न जर जास्त खाल्लें, त्याचें चांगलें चर्वण झालें नाहीं, तर अपचन होईल; इतकेंच नाहीं, तर त्यापासून प्रकृति