पान:वाचन.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
वाचन.

वाचन हैं ज्ञान मिळविण्याचें सुलभ व उत्कृष्ट साधन आहे, हैं पूर्वी सांगितलेच आहे. जॉन स्टुअर्ट मिल यानें एके ठिकाणीं लिहिलें आहे कीं, ' मी अगोदर पंचवीस वर्षे जन्मून जितकें ज्ञान मला झालें असतें, तितकें बापाच्या शिक्षेमुळें सहज झालें. ' आयुष्याचा अपव्यय होऊं नये, थोड्या काळांत आपणांस पुष्कळ ज्ञान प्राप्त व्हावे, याकरितां लहानपणापासून वाचनाची संवय लागली की, आपण निरनिराळे ग्रंथ पाहूं लागतों व नवीन ज्ञानसंपादन करण्याची आपणांस गोडी लागते.
 वाचनापासून 'जे अनेक फायदे आहेत, त्यांतील मुख्य मुख्य येथें सांगणें अवश्य आहे. वाचनापासून मनोरंजन होऊन ज्ञान- प्राप्ति होते. पूर्वीच्या लोकांचा अनुभव मिळून त्याचा आपणांस फायदा होतो. मन आळशी न राहतां उद्योगांत गुंतलेले राहतें. विचारशक्ति जागृत होऊन ज्या गोष्टी पूर्वी आपणांस कळत नसतात, त्या आपोआप कळू लागतात. विचारशक्ति वृद्धिंगत होते. दुर्गुणी लोकांविषयीं तिरस्कार उत्पन्न होतो. सत्समाग• माचा लाभ होऊन आपले वर्तन सुधारतें, आपल्या आंगचे दुर्गुण नाहींसे होऊन आंगीं विनयता व नम्रत्व हीं येतात. असत्याचा तिरस्कार व सत्याविषयीं प्रीति उत्पन्न होते. विवेक उत्पन्न होऊन आपणांस आपली खरी योग्यता समजते. भूतदया आंगीं येते. इहलोकीं सुख मिळून परलोकींही सग मिळते. इत्यादि अनेक फायदे होतात आणि ह्मणूनच विद्वानन् लोकांनी वाचनाचे एवढे पोवाडे गाइले आहेत !