Jump to content

पान:वाचन.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचनाची अभिरुचि.

२९

कडे ते ढुंकूनसुद्धां बघत नाहींत, पुस्तकें न उघडण्याविषय जणूं काय ते शपथच वाहतात. जगांत काय चाललें आहे, हें त्यांना कधीही कळत नाहीं. तसेंच आपल्या भाषेत इतिहास, काव्य, निबंध, कादंबच्या इत्यादि ग्रंथांत चांगले ग्रंथ कोणते, त्यांची नांवेंसुद्धां त्यांना माहीत नसतात. नुसती नांवेंही जेथें माहीत असण्याची मारामार, तेथे त्या ग्रंथांचे वाचन कसलें ! आमचे सुतार, सोनार, लोहार, तेली, तांबोळी, साळी, माळी, शेतकरी इत्यादि अनेक लोकांकडे पाहिलें म्हणजे आम्ही म्हणतो याची सत्यता सहज दिसून येईल, त्या लोकांस नुसतें ट-फच जर येत नाहीं, तर पुस्तकें वाचण्याची गोष्ट दूरच राहिली ! एखाद्या सुंदर राजवाड्यांत किंवा सुरम्य उपवनांत आंधळ्यास नेलें असतां त्यास जसा आनंद व्हावयाचा नाहीं, तद्वत्च या आमच्या निरक्षर बंधूंची स्थिति होय ! पुस्तकांत सांठवून ठेवि- लेल्या ज्ञानामृताचा अंशतः लाभ झाल्यामुळे विद्वान् लोकांस जो आनंद होतो, तो या विचान्यांस काय बरें ठाऊक !
 ज्यांना लिहिणें वाचणें येत नाहीं किंवा विद्येचा ज्यांना गं नाहीं, अशा अशिक्षित किंवा अडाणी लोकांची ही स्थिति झाली. आतां सुशिक्षित म्हणविणाऱ्या लोकांस वाचनाची कितपत आवड असते, हें पाहिलें पाहिजे. विश्वविद्यालयाच्या परीक्षा पास झाल्यावर अथवा एखादी नौकरी मिळवून पोटाचा व्यवसाय करूं लागल्यावर आमचे बहुतेक तरुण लोक पुस्तकांना फारकत देतात. वर्षानुवर्षे ते पुस्तकें उघडीतसुद्धां नाहींत. एकाददुसरें शिळें वर्तमानपत्र वाचलें तर वाचलें, नाहीं तर त्याचीही त्यांना मुळींच अपेक्षा नसते. त्यांच्या घरांतील सांदीकोंपयांत कोठें पूर्वीचीं पांच चार जुनाट पुस्तकें पडून राहिली असली, तर तीही वाळवीच्या भक्ष्यस्थानी पडतात. नवीन उपयुक्त पुस्तकें पैसे खर्चून