पान:वाचन.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
वाचन.

झाला, त्यांत मी आपले दुःख विसरून मेलों वृद्धापकाळ मजला गांठीत आहे, याचें मजला भानही राहिलें नाहीं. " राज्यवैभव सोडून ज्ञानार्जनाकरितां गौतमबुद्ध जंगलांत एकांतांत राहून मनन करीत असतांना त्यास बोध झाला, तेव्हां त्यास अत्यंत आनंद झाला! वाचनांत मन व्यावृत असल्यामुळे दुःखावेग कमी होतो. जग क्षणभंगुर असून या भवसागरांत मनुष्यावर अनेक विकट प्रसंग नेहमी येतात, असे विचार मनांत येऊन आपणांस दुःखाचा विसर पडतो. इतकेंच नाहीं, तर तें दुःख सहन करण्याइतकें धैर्य आपल्या आंगीं वाचनाच्यायोगानें येतें.
 आळस हा मोठा दुर्गुण आहे आणि तो आमच्या लोकांच्या अगदी हाडीमासीं खिळलेला आहे. 'आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपुः' मनुष्याच्या शरीराला आळस हा महान् रिपु आहे, असें भर्तृहरीनें एके ठिकाणीं हाटलें आहे आळस गुन्हा समजून आळशी लोकांस ग्रीक लोक शिक्षा करीत असत. परंतु आळसानें आह्मांस अगदीं खाऊन टाकिलें आहे. पोटास मिळविलें पाहिजे हाणूनच आमचे लोक उद्योग करितात, असें झणावें लागतें. नाहींतर त्यांनी उद्योगच केला नसता. थोडें - फार शिकून एखादी नौकरी मिळवावयाची किंवा घरीं चालत असलेला धंदा तसाच पुढे चालवावयाचा. एवढे केलें छाणजे आपली इतिकर्तव्यता आटोपली, असें समजून बाकी राहि- लेला वेळ कित्येक नाचतमाशांत किंवा गप्पागोष्टींत, कित्येक झोपा काढण्यांत व कित्येक आळसांत घालवितात ! पैशापेक्षांही अमोल असा वेळ ते दररोज किती तरी व्यर्थ दवड- तात ! परंतु त्या वेळाचा कांहींतरी उपयोग करावा, असे कधीही त्यांच्या मनांत येत नाहीं. शाळेंत जीं काय दहापांच पुस्तकें बाचण्यांत आली असतील तेवढीच. शाळा सोडल्यावर पुस्तकां-