पान:वाचन.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचनाची अभिरुचि.

२७

मिळविण्याकरितां प्रसिद्ध इतिहासकार स्ट्रैबो आणि हेरोडो- स यांना प्रवास करावे लागत असत, इतकेच नाहीं, तर प्रवा- सांत त्यांना त्या प्रदेशांची भूगोलविषयक माहिती मिळवून टिपून ठेवणे भाग पडे. या गोष्टी वाचल्या हाणजे हल्लीं शाना- र्जनाच्या ज्या अनेक सोयी झाल्या आहेत, त्यांची वाचकांस सहज अटकळ करितां येईल.
 वाचनाच्या योगानें ग्रंथातील विचारांचा ठसा आपल्या मना- वर उमटतो. त्यामुळे आपल्या विचारांत भर पडून ते बरे किंवा वाईट बनतात, व विचार बदलले ह्मणजे त्याप्रमाणे आपली मतें बदलतात. आणि मतांचें पर्यवसान शेवटी आपल्या वर्तनांत होतें. सारांश, चांगलीं पुस्तकें वाचण्याचा क्रम ठेविला असतां आपले वर्तन चांगलें होतें. सद्गुणांविषयीं भक्ति व दुर्गुणांविषयीं तिटकारा आपल्या मनांत उत्पन्न होतो. इहलोकींची यात्रा आपणांस सुखकर होऊन परलोकीं सद्गति मिळते.
 वाचनाच्या योगाने मनरंजन होऊन ज्ञानप्राप्ति होते. कोणाची संपत्ति जाऊन तो दरिद्री झाला असेल; कोणाची सुस्वरूप स्त्री अथवा जीवापेक्षांही पलिकडे असा एकुलता एक मुलगा निवर्तला असेल; कोणास व्यंगता आली असेल; कोणास सन्मित्रवियोग झाला असेल; अथवा असाच दुसरा कोणता तरी प्रसंग कोसळून कोणास फार दुःख झालें असेल किंवा आपलें जीवित कंटाळवाणें झालें असेल; अशा वेळीं सर्व दुःखांचा परिहार होण्यास वाचनासारखे उत्तम साधन नाहीं. चिनी धर्म- शास्ता कानफ्यूशियस हा स्वतःविषयीं लिहीत असतां हाणतो कीं, "मी आस्थेनें ज्ञानसंपादन करीत असतांना अन्नपाणी विसरलो होतो. तेंच ज्ञानसंपादन केल्यावर जो मला आनंद