पान:वाचन.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
वाचन:

धर्मोपदेशकांच्या मठांत किंवा विद्यालयांत हस्तलिखित ग्रंथ असत. त्यांची संख्या शैदीडशेवर क्वचितच असे. गेम्बलर येथील ऑलबर्ट नामक एका महंतानें जिवापाड श्रम करून व सर्व आयुष्यभर खपून अवघे दीडशें ग्रंथ जमविले होते व तो त्याचा प्रचंड ग्रंथसंग्रह पाहून सर्व लोक आश्चर्यचकित होत असत. इ. स. १३०० पूर्वी ऑक्सफोर्ड येथील मोठ्या ग्रंथसंग्रहालयांत जीं थोडी लहानमोठीं पुस्तकें होतीं, तीं पेटींत बंद करून ठेविली असून पेटी साखळदंडानें बांधून टाकिली होती. पाश्चात्य देशांत धर्माधिकायांच्या मठांत थोडाफार ग्रंथसंग्रह असे. मठांत राहणारे जोगी लोक ग्रंथ लिहून थोडाफार पैसा मिळवीत असत.
ग्रंथ लिहून काढावे लागत असल्यामुळे त्यांना फार किंमत पडत असे. आपल्या देशांत शास्त्री, पुराणिक यांच्या घरी - थांचा संग्रह असून ते बहुधा लोकांस ग्रंथ वाचावयास देत असत. ज्या शास्त्र्याकडे ग्रंथ अधिक, त्याला विशेष मान मिळत असे. तसेंच विद्याभिलाषी राजे लोकांना ग्रंथसंग्रह करण्यांत भूषण वाटे. श्रीमान् लोकही थोडाफार ग्रंथसंग्रह करून गोरगरिबांस ते वाचावयास देण्यांत विशेष पुण्य समजत. कित्येक पुरुष व क्वचित् स्त्रियाही ग्रंथलेखनाचा धंदा करून चरितार्थ चालवीत असत. त्याकाळी कागद नसल्यामुळे भूर्जपत्र, ताडपत्र ह्या पानांवर ग्रंथ लिहिण्याचा प्रघात असे. ग्रंथांच्या शेवटीं बहुतकरून खालील श्लोक लिहीत असत.

तैलाद्रक्षेजलाद्रक्षेद्रक्षेत् शिथिलबंधनात् ।
मूर्खहस्ते न दातव्यमेवं पुस्तकरक्षणम् ॥

 यावरून ग्रंथांची काळजी पूर्वी किती घेतली जात असे, हैं व्यक्त होतें. त्रावणकोर, तंजावर, काश्मीर, जयपूर वगैरे अनेक