पान:वाचन.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ग्रंथ.

२१

 जगांतील सर्व वस्तूंचा नाश करण्याचा सपाटा काळानें एक सारखा चालविला आहे. परंतु उत्तम ग्रंथ या काळाच्या तडाख्यांतून वांचले आहेत. इतकेच नाहीं, तर जसजसा काळ जातो तसतसा त्यांचा कीर्तिपरिमळ अधिकाधिक पसरत आहे. खाल्डि- यन लोकांचे विटांवर लिहिलेले ग्रंथ हल्लीं उपलब्ध आहेत. रामायण व महाभारत हे ग्रंथ सुमारें चार हजार वर्षापूर्वी लिहिले गेले असून ते अद्यापि जसेच्या तसेच आहेत. होमरकवीनें 'इलियड' नामक ग्रंथ लिहिल्यास अडीच हजार वर्षे होऊन गेलीं असून अद्यापि त्या ग्रंथांचें एक अक्षरही नष्ट झालेलें नाहीं. प्लूटार्क याने सुमारें एकुणवीसशे वर्षापूर्वी जी चरित्रमाला लिहिली आहे ती अद्यापि जशीच्या तशीच आहे. साक्रेटीस व प्लेटो या प्राचीन तत्ववेत्त्यांची भाषणें अद्यापि आपणांस जशींच्यातशींच वाचावयास मिळतात. या अवधींत कित्येक भव्य व सुंदर राजवाडे, दिव्य मंदिरें, सुरम्य उपवनें पार विलयास जाऊन त्यांचा मागमूसही राहिला नाहीं ! कित्येक पुरुष व राष्ट्रं उदयास आलीं व विनाश पावलों ! परंतु वर सांगितलेले ग्रंथ अझुन जसेच्या तसेच कायम आहेत. इतकेंच नाहीं, तर अनेक भाषांत त्यांचीं भाषांतरें होऊन त्यांचा अधिक प्रसार होत आहे. त्याचें सत्कार्य वाढत आहे. यावरून ग्रंथांस नाश नाहीं असें नाहीं. त्यांचा नाश त्यांतील विचारांवर अवलंबून असतो. विचार उत्तम असून त्यांत सत्याचा भाग जितका अधिक, तितका तो ग्रंथ अधिक काळ- पर्यंत टिकतो. कोत्या विचारांच्या ग्रंथांकडे कोणी पाहत नसल्या- मुळे ते काळाच्या व वाळवीच्या भक्ष्यस्थानीं पडून लवकरच नाहीसे होतात.
 मुद्रणकला निघण्यापूर्वी ग्रंथ हातानें लिहून काढण्यास फार श्रम लागत असल्यामुळें ते दुर्मिळ असत, पाश्चात्य देशांत