पान:वाचन.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ग्रंथ.
२३

टिकाणी पूर्वी मोठी संस्कृत ग्रंथसंग्रहालये होती. श्रीनगर येथील राघवदास नामक रामाच्या देवालयांत ४५०० हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह केलेला आढळून येतो. यावरून आमच्या लोकांस पूर्वीपासून विद्येची अभिरुचि विशेष आहे, हैं उ दिसून येतें.
 मुसलमान लोकांचें या देशांत आगमन होण्यापूर्वी सुधारणेच्या बाबतींत आमचें पाऊल अव्याहत पुढे पडत चाललें होतें. परंतु मुसलमानांचा या देशांत प्रवेश झाल्यापासून आह्मी दुर्दैवाच्या महान् फेऱ्यांत सांपडलों ! देशांतील शांतता नष्ट झाल्यामुळे लोकांची मनें व्यग्र झाली. कलाकौशल्यासारख्या बाबतींत शोध करण्याचें टाकून देऊन जो तो आपआपल्या फिकीरींत चूर झाला. अनास्थेमुळें पुष्कळ ग्रंथांचा नाश झाला. 'बळी तो कान पिळी' ही स्थित कित्येक शतकेंपर्यंत चालू राहिल्यामुळे आमचें ग्रंथ- भांडार अतएव ज्ञानभांडार नष्ट होऊन आमची अवनति झाली. पोर्तुगीज किंवा फ्रेंच लोकांनी या बाबतींत मुळींच लक्ष्य घातलें नाहीं. इंग्रज लोकांचा अंमल सुरू झाल्यापासून सर्वत्र शांतता झाली. ते स्वतः विद्याभिलाषी असल्यामुळे कर्नल टॉड, ग्रँट डफ, लॉर्ड एल्फिन्स्टन, सर जॉन मालकम, मॉनियर विलियम्स्, प्रो० मॅक्समुल्लर इत्यादि आंग्ल ग्रंथकारांनी इतिहासविषयक व धर्मविषयक अनेक ग्रंथ लिहून आह्मांस अत्यंत ऋणी करून ठेविलें आहे.
 लोकशिक्षणाचें काम सरकारने हातीं घेतलें असून गांवोगांव शाळा स्थापिल्या आहेत. जिल्ह्यांतील मुख्य मुख्य शहरी इंग्रजी भाषेच्या अभ्यासाकरितां वरिष्ठ प्रतीच्या शाळा स्थापिल्या असून प्रांतोप्रांती विद्यापीठें स्थापिली आहेत. ब्राह्मणापासून तो तहत् अति-