पान:वाचन.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ग्रंथ.

१९

ऑरोलियस यांसारखे तत्वज्ञानी; गौतमबुद्ध, शंकराचार्य आणि महंमद यांसारखे धर्मसंस्थापक; तसेंच व्यास, वाल्मीकि, शेस्पियर, मिल्टन यांसारखे कविवर्य यांनी ज्या काम आपले सर्व आयुष्य वेचलें, तेंच काम ते जरी आज विद्यमान नाहींत तरी, पूर्वीपेक्षाही अधिक प्रमाणाने करीत आहेत. त्यांच्या विचारांचा किंवा उक्तींचा रिघाव एखाद्या भिकार झोंपड्यापासून तों सुंदर दैदीप्यमान राजवाड्यापर्यंत झाला आहे. त्यांचे उत्तमोत्तम विचार त्यांच्या ग्रंथांत गोंविले असल्या- मुळे आपणास वाटेल त्यावेळीं ते वाचण्यास किंवा ऐकण्यास मिळतात. पूर्वी ते जें कळकळीनें सांगत होते तेंच आज़ सांगत आहेत. सद्गुरु मिळणें फार दुर्घट असून त्याचा सहवास घडणें, र्हे तर फारच दुर्घट आहे. परंतु ग्रंथांचें तसें नाहीं. अल्प किमतींत ते आपणांस मिळतात; वाटेल त्यावेळीं सद्बोध करण्यास किंवा नवीन ज्ञान देण्यास ते तत्पर असतात; ते कधीं कुरकुरत नाहींत किंवा गुरुदक्षिणा मागत नाहींत ; कधीं रुष्ट होत नाहींत किंवा सद्बोध करण्यास नाकारीत नाहींत. सारांश, ग्रंथांचा गौरव करावा तेवढा थोडाच होणार आहे.
 शिकंदर बादशहानें सर्व पृथ्वी पादाक्रांत केली. अनेक देशांचे राजे दातीं तृण धरून त्यास शरण आले. त्याच्यासारखे अपार वैभव दुसऱ्या कोणाचेंही नव्हतें. तो आशिया खंडांत विजय - ध्वज फडकावीत असतां इराणचा बादशहा दारियस याची अंति मौल्यवान रत्नजडित पेटी त्यास मिळाली. तेव्हां त्याच्या मंत्रि- मंडळापैकी एकाने त्यांस प्रश्न केला कीं, "या पेटीत ठेवण्याजोगी अशी योग्य वस्तु कोणती आहे?" त्यावर बादशहानें उत्तर दिलें, 'हीत ठेवण्यालायक मजजवळ एक वस्तु आहे, ती कोणती म्हणाल तर होमरचे ग्रंथ ! यावरून शिकंदर बादशहा हो कवीच्या ग्रंथांस किती पूज्य मानीत असे, याची कल्पना आमचे सुज्ञ वाचक सहज करतील.