पान:वाचन.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
वाचन.

अल कविश्रेष्ठांच्या सुरस, उत्तमोत्तम व मोलवान् विचारांस कायमचे मुकलों असतो. त्या अलौकिक पुरुषांचीं मृण्मय शरीरें जरी नष्ट झाली आहेत, तरी ते विचाररूपानें जगांत अस्तित्वांत आहेत. फार प्राचीन काळीं खाल्डियन, आसिरियन् आणि इजिप्शियन् हे लोक बरेच सुधारलेले असून, त्यांनीं अनेक नवीन नवीन शोध लाविले होते, परंतु त्या लोकांचे इतिहास बरोबर लिहिले नसल्याकारणानें त्यांजविपयींचें बहुतेक ज्ञान नष्ट झालें आहे. त्यांच्या ज्या कांहीं वस्तु सांपडत आहेत त्यांवरून अनुमानानें त्यांजविषयीं शोध चालू आहेत.
 लॉर्ड बेकन यानें ग्रंथांची जहाजांशी तुलना केली आहे. नौ- कांच्या साहाय्याने जसा या देशांतील माल त्या देशांत आणि त्या देशांतील माल या देशांत आणतां येतो, तद्वत् या ग्रंथनौकांच्या साहाय्याने अन्य देशांतील ज्ञानभांडार आपल्या देशांत आणून आ. पल्या देशबांधवांस ज्ञानसंपन्न करितां येतें. इंग्लिश लोकांनी या ग्रंथनौकांच्या साहाय्याने देशोदेशांतून ज्ञानभांडार आणून तें आ- पल्या देशाच्या किनाऱ्यावर उतरून घेतलें व त्याचा आपल्या देशांधवांस पूर्ण लाभ होईल अशा अनेक सोयी केल्या. दुसरीं राष्ट्रही याच कामी गुंतलेली आहेत. जगांत आमचें पाऊल पुढे पडावे अशी जर आपली मनापासून इच्छा असेल, तर विचाररूपी मालाने भरलेल्या या ग्रंथनौका आम्ही आपल्या देशांत आणून त्यांतील ज्ञानभांडार आपल्या देशबांधवांस वाटलें पाहिजे.

 गुरूची योग्यता सर्व देशांत विशेष मानितात. आम्ही ह्मणतों, ग्रंथ हे आपणांस गुरुस्थानीं होत. साक्रेटीस, प्लेटो, मार्कस


  • एका आंग्ल कवीनें हाटलें आहे:-

'Tis said that memory is age,
and that though dead, men are alive.
Removed from sorrow, care and strife,
They live because their works survive,