पान:वाचन.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ग्रंथ.

१७

इंडियन, आफ्रिकेतील झुलु किंवा ऑस्ट्रेलियांतील मोराई ह्या लोकांकडे पाहिलें आणि त्यांच्या स्थितीविषयी विचार केला तर सिसरोचें हें ह्मणणे अगदीं खरें आहे, असें आपल्या पूर्ण अनुभवास येतें. आज विसावें शतक लागलें आहे, तरी त्यांची स्थिति अगदीं पहिल्याप्रमाणें आहे. आगगाड्या, तारायंत्रें, मुद्रणकला वगैरे अनेक शोध लागल्यामुळे, जगाची उन्नति झपाट्याने होत आहे. पूर्वी राजवाड्यांतसुद्धां ज्या वस्तु क्वचित् पाहण्यास मिळत असत, त्या यंत्रांच्या साहाय्यानें अति स्वल्प झाल्यामुळे, झोंपडीतसुद्धां आतां दृष्टीस पडूं लागल्या आहेत. जे ग्रंथ पूर्वी महान् पंडितांसही पाहण्यास मिळत नव्हते, ते आतां स्वल्प किंमतीत मिळू लागल्यामुळे गोरगरिबांस सुद्धां संग्रही ठेवितां येतात. अशीं सुखवृद्धीचीं अनेक साधनें प्राप्त झाली असून, झुलु किंवा मोराई लोक हे रानटी स्थितीत कां ? शिकार करून भक्ष्य मिळवावें, आणि गवताची झोंपडी बांधून तीत रहावें, यापलीकडे त्यांना फारसें कां समजूं नये ? याचे मुख्य कारण हें कीं, त्यांच्यांत लेखनकला नाहीं. मनुष्याच्या उत्कर्षाची किंवा उन्नतीची सर्व इमारत लेखनकलेवर उभारलेली आहे.
 विचार हे आकाशांतील विद्युल्लतेप्रमाणें चंचल व क्षणिक अस तात. ते उद्भवतात आणि क्षणार्धात नाहींसे होतात. ते उद्भवले ह्मणजे त्यांजविषयीं विचार करून आपला अनुभव, ज्ञान व अव- लोकन यांत त्यांना गोंवून टाकलें, तरच ते कांहीं काळ टिकतात. परंतु असें केल्यानेही ते फारसे टिकण्याचा संभव नाहीं. कारण ज्या मनुष्याच्या डोक्यांत ते असतील त्याचा अंत झाला कीं, त्याबरोबर तेही नष्ट होतात. लेखनकलेच्या योगानें विचारांस स्थिरत्व देतां येतें व ते अमर करितां येतात. लेखनकला नसती तर आपण होमर, व्हर्जिल, प्लेटो, सिसरो इत्यादि ग्रीक व रोमन विद्वद्रत्नांच्या व्यास, वाल्मीकि, कालिदास, रामदास, तुकाराम या आर्य कविवर्याच्या तसेच शेस्पियर, मिल्टन, टेनिसन या