पान:वाचन.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
वाचन.

छाती, लोहाराचा हात, तालीमबाजाचें शरीर, हीं सहवासानें अथवा संवयीनें जशीं घट्ट होतात, तशी विचार करून करून विचारशक्ति वृद्धिंगत होते.
 जगांत अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक मतें प्रचलित आहेत, तसेच सत्य आणि असत्य यांची अगदीं भेसळ झालेली आहे. त्यांतून आपणांस सत्य शोधून काढून सत्यावलंबन करावयाचें आहे. तरी आपणांस आपली विचारशक्ति वाढविली पाहिजे. विचारशक्ति ही दिव्यज्योति असून हिच्या साहाय्यानें सत्य काय, असत्य काय, हे आपणास कळू लागतें. अवलोकन करण्यांत, वाचनांत, किंवा वादविवाद करण्यांत आपण जेवढा वेळ घाल- वितों तेवढाच वेळ आपण त्या गोष्टींचें मनन करण्यांत घालवि- ण्याचा क्रम ठेविला, तर जें ज्ञान किंवा जो अनुभव मिळण्यास इतरांस वर्षेच्या वर्षे लागतात, तें ज्ञान किंवा तो अनुभव आपणांस अल्पकाळांत साध्य करून घेतां येईल.


भाग ३ रा.

ग्रंथ.
जेणें धारिष्ट चढे । जेणें परोपकार घडे ।

जेणें विषयवासना मोडे । त्या नांव ग्रंथ ॥ जेणें होय उपरती । अवगुण अवधे पालटती ।

जेणें चुके अधोगति । त्या नांव ग्रंथ ॥

रामदास.

प्रसिद्ध रोमन वक्ता सिसरो यानें लेखनकलेविषयीं एके ठिकाणी हाटलें आहे कीं, 'लेखनकला जर नसती तर, मूळारंभीं जी जगाची स्थिति होती, तिजपेक्षां पुढें पाऊल पडते ना.' हें त्याचें ह्मणणें शब्दशः खरे आहे. अमेरिकेतील तांबडे