पान:वाचन.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ज्ञानार्जनाची पांच साधनें-

१५

झाला की, सर्व राष्ट्र क्षुब्ध होऊन फ्रान्सांत राज्यक्रांति झाली. व्होलटेर याच्या लेखणीचा प्रभाव एवढा मोठा होता कीं, जर्मन बादशहा फ्रेडरिक धि ग्रेट हा त्याशी यावरून वक्तृत्वापेक्षां प्रसंगविशेषी लेखनाचा मैत्री करून असे. प्रभाव फार मोठा आहे, हैं उघड आहे.
 ५ मनन . - पचनशक्तीच जर आंगांत नाहीं तर पौष्टिक पदार्थ खाण्यापासून काय उपयोग ? ती आंगीं असली ह्मणजे पौष्टिक पदार्थ पचवून त्यांतील सत्व आपलेसे करून टाकितां येतें. तसेंच दुसऱ्यांचे विचार आपलेसे करून टाकण्यास ते अगोदर ऐकिले पाहिजेत किंवा वाचले पाहिजेत, नंतर त्यांविषयीं मनन केलें पाहिजे, हाणजे ते विचार अगदी आपलेसे होतात. नुसतें अवलोकन करून, वाचून, व्याख्यानें ऐकून किंवा वादविवाद करून कधींही भागावयाचें नाहीं. तीं ध्यनांत राहण्यास किंवा त्यांतील सत्यासत्य समजण्यास आपणास त्यांविषयीं विचार केला पाहिजे; तरच तीं आपल्या मनांत उतरतील, ध्यानांत राहतील; नाहींतर हजारों व्याख्यानें ऐकिलीं किंवा भारेच्याभारे पुस्तकें वाचलीं तरी त्यांपा- सून काडीएवढाही फायदा होणार नाहीं.*

 कोणत्याही गोष्टींचा आपण जोपर्यंत विचार करीत नाहीं, तोपर्यंत त्या आपणास कळत नाहींत. परंतु एकदां विचार करूं लागलों कीं, मग त्या गोष्टी आपणास सहज कळू लागतात. तसेंच ज्या गोष्टी दुर्बोध वाटून आपले विचार कुंठित होतात, त्यांचाही विचाराच्या साहाय्यानें उलगडा होतो. बैलाची मान, घोड्याची


  • चिंतनासि नलगे वेळ । सर्वकाळ करावें - तुकाराम.

सेविलेंचि सेवावें अन्न । घेतिलेंचि घ्यावें जीवन ।
तैसें श्रवण मनन । केलेंचि पाहिजे ॥ १ ॥ सकळांमध्यें विशेष श्रवण । श्रवणाहून थोर मनन ।
मननें होय समाधान । बहुत जनाचें ॥ २ ॥ - रामदास.