पान:वाचन.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
वाचन.

पुष्कळ माहिती मिळते. भाषणाची प्रवृत्ति जरी पूर्वापार चालत आली आहे, तरी अलीकडे तिला बरेंच प्रोत्साहन मिळाले आहे. भाषणाच्या शेवटी व्याख्यात्यास प्रश्न विचारून शंकानिवृत्ति कर- ण्याची चाल पाश्चात्य देशांत आहे. तीपासून विशेष फायदा होतो. कारण, श्रोतृसमाजापैकीं कोणास कांहीं शंका असल्यास अथवा व्याख्यात्यापासून कोणास कांहीं विशेष माहिती पाहिजे असल्यास, ती त्यास तेव्हांच सहज मिळवितां येते.
 जनसमूहाच्या मनांत कोणतीही गोष्ट भरवून देण्यास व तीसंब- धानें लोकांत चळवळ सुरू करण्यास व्याख्यानासारखें अन्य साधन नाहीं. डिमॉस्थेनिस व सिसरो या प्राचीन महात्म्यांनीं आपल्या अलौकिक वाणीनें ग्रीक व रोमन राष्ट्रांस अगदी हालवून सोडलें, लोकांस जागृत करून त्यांच्या आंगांत वीरश्री उत्पन्न केली. हिंदु- स्थानचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स याची पार्लमेंट सभेत 'चवकशी चालू असतांना एडमंड वर्क यानें जें अस्खलित व आवेशयुक्त भाषण केलें तें ऐकून खुद्द वॉरन हेस्टिंग्स याच्या डोळ्यांत अश्रुबिंदु आले ! सर्व सभा अगदी थक्क झाली, व बर्फ सांगतो तें शब्दशः खरे आहे, असें सर्वोस वाटलें ! केवढा हा भाषणाचा प्रभाव ! फ्रान्स देशांत राज्यक्रांति होण्याची चिन्हें दिसूं लागलीं, तेव्हां सर्व युरोपखंडांत विद्वान् व राज्य- कारणी मंडळांत मोठी चर्चा होऊन विलक्षण चळवळ झाली, ती बर्क यास न आवडून तिच्याविरुद्ध त्याने पार्लमेंटांत मोठ्या आवेशाची भाषणे केली. परंतु भाषणाचा प्रभाव नियमित स्थळ व नियमित प्रेक्षकांवरच काय तो पडणार व तो त्या प्रसंगाच्या मानाने अगदीं अल्प आहे, असें त्यास कळून आले, तेव्हां त्याने लागलीच अक्षरजननी उचलली व असा उत्कृष्ट निबंध लिहिला कीं, त्याचा प्रसार सर्व यूरोपखंडभर होऊन तेणेंकरून राज्यक्रांतीची लाट जी सर्व राष्ट्रांवर लवकरच उसळ. णार होती, ती ठिकच्याठिकाणी विराम पावली. व्होलटेर आणि रासो या फ्रेंच ग्रंथकारांच्या लिहिण्याचा एवढा प्रभाव