पान:वाचन.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ज्ञानार्जनाची पांच साधनें.

१३

 ४. भाषण अथवा व्याख्यान. – एकच मनुष्य ह्मणेल कीं, मी वनस्पतिशास्त्र, भूगर्भशास्त्र, पश्वादीप्राणिशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र इत्यादि अनेक शास्त्रे शिकेन, तर तें त्याचें ह्मणणे अगदी वेडेपणाचे होईल. जगांतील ज्ञानसंचय इतका वाढला आहे कीं, फक्त एकच शास्त्र घेऊन त्याचा अभ्यास करण्यास वर्षानुवर्षे घालवावी लागतात, तेव्हां कोठें त्या शास्त्रांत प्रविणता प्राप्त होते. नंतर पुढे त्या शास्त्रासंबंधीं नवीन ग्रंथ लिहिण्या- इतकी किंवा नवीन शोध करण्याइतकी विद्वत्ता अंगी येते. असे जे ज्ञानसंपन्न लोक असतात, ते आपल्या आवडत्या विषयासंबं- धानें व्याख्याने देतात. त्या शास्त्रासंबंधानें प्राचीन किंवा अर्वाचीन ग्रंथकारांचीं मतें चुकीचीं दिसल्यास किंवा त्या शास्त्रा- विषयीं नवीन शोध लागले असल्यास ते जनसमूहापुढे मांडण्यास भाषणासारखें दुसरें उत्तम साधन नाहीं. कधीं कधीं अशा भाष- णास उत्तरादाखल दुसरीही भाषणे होतात. आणि मग वर्तमान- पत्रांत वादविवाद चालू होऊन कांहीं काळाने सत्य तेवढ्या गोष्टी लोकांस कळतात आणि पुढें पुस्तकरूपानें त्यांना कायमचें स्वरूप मिळतें.

 कोणताही एकादा विषय घेऊन त्यावर कांहीं लोक आपल्या मंडळीमध्यें व्याख्याने देतात. लहान लहान व उपयुक्त विषय घेऊन शिक्षक विद्यार्थ्यांस भाषणद्वारा त्या विषयासंबंधी माहिती करून देतात. धर्मोपदेशक भाषणद्वारा धर्मोपदेश करितात. कोणी एखादें सुरम्य स्थळ पाहिलें असतां किंवा कोणी अन्य देशांत जाऊन तिकडील लोकांच्या चालीरीति पाहून आला असतां त्या मनुष्याची व्याख्याने होतात व त्यांपासून श्रोतृवृंदास अनायासें


  • आपण यथेष्ट जेवणें । उरलें अन्न तें वांटणें ॥

परंतु वायां दवडणें । हा धर्म नव्हे ॥ १ ॥
तैसें ज्ञानी तृप्त व्हावें । तेंचि ज्ञान जगासी सांगावें ।
तर बुडों न द्यावें । बुडत्यासी ॥ २ ॥ ---रामदास.

(२) ९७१ - १५००-६-७-१०