पान:वाचन.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९
वाचन.

आपणास बसल्या ठिकाणी करून घेतां आपणास फिरावें लागत नाहीं किंवा येतो; त्याकरिता देशान्तर करावें लागत नाहीं. तसेंच जे विद्वान् लोक जगांत पूर्वकाळी होऊन गेले व विचाररूपानेंच जे आज जगांत हयात आहेत, अशा लोकांच्या ज्ञानाचा फायदा आपणास वाचनाच्या योगानें सहज करून घेतां घेतो. होमर, व्हर्जिल, शेक्स्पियर, कालिदास या अलौकिक बुद्धीच्या पुरुषश्रेष्ठांस हैं जग सोडून कित्येक शतकें झालीं, त्यांचीं मृतशरीरें मातीशीं मिळून गेली, तरी ते विचार- रूपाने जिवंत असून आपणांबरोबर बोलण्यास, हांसण्यास, आप- णांस उपदेश करण्यास सदा तत्पर आहेत. त्यांनी आपले उत्तमोत्तम विचार आपल्या ग्रंथांत लिहून ठेविले आहेत, मात्र आपण त्यांचे ग्रंथ वाचले ह्मणजे झालें.
 पूर्वी ग्रंथ फार दुर्मिळ असत. मोठमोठ्या ग्रंथसंग्रहालयांत दोन अडीचशेपेक्षां अधिक ग्रंथ क्वचित् असत. सर्व ग्रंथ हातानें लिहून काढावे लागत असल्यामुळें, ग्रंथ पहाण्याससुद्धां मिळत नसत. आणि याकरितां ते समग्र पाठ करावे लागत असत, अशी स्थिति असल्यामुळें गुरुमुख व संवाद हीं त्या काळी ज्ञान मिळविण्याचीं मुख्य दोन साधनें असून, त्यांची योग्यता सर्वत्र विशेष समजली जात असे. परंतु गाटेनबर्ग यानें छापण्याच्या कलेचा शोध लाविल्यापासून पूर्वीची सर्व स्थिति बदलली. जे ग्रंथ पूर्वी पाहण्यास सुद्धां मिळत नसत, ते अति स्वल्प किंमतीत सर्वास मिळू लागले. नवीन ग्रंथ छापून भराभर निघू लागले. यामुळें वाचनाची अभिरुचि वाढून वाचन हैं ज्ञान प्राप्त करून घेण्याचें मुख्य साधन झालें. ज्ञानसंपन्न लोकांत वाचनाची अभिरुचि वाढली. वाचन हा विषय फार मोठा अस- ल्यामुळे व याच विषयाचें या निबंधांत विवेचन करावयाचें अस- ल्यामुळे, या विषयांतर्गत सर्व गोष्टींचें यथानुक्रमें, विवेचन होईल, प्रस्तुत आपणास ज्ञानाचे जे चवथें साधन भाषण त्याकडे वळले पाहिजे.