पान:वाचन.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
वाचन.

प्रवास करणं असून कांहीं वेळपर्यंत वाट चालल्यावर आपण भांबावली आणि कोणीकडे जावें हें आपणास सुचेनासें झालें . तर, आपली काय स्थिति होईल ? अशा वेळीं आपणास जर कोणी वाटाड्या भेटला आणि त्यानें उत्तम व सुलभ मार्गानें आपणास त्या जंगलांतून बाहेर काढिलें, तर आपणास केवढा आनंद होईल बरें ! त्या वाटाड्याचे उपकार आपण कधीही विसरणार नाहीं ! तद्वत्च गुरूचें होय. ते जगांतील खांचखळगे वगैरे अनेक अडचणी आपणास दाखवितात आणि ज्ञान देऊन सन्मार्गास लावितात.
 जे आपले समवयस्क व सहाध्यायी सहृदय मित्र असतील, त्यांशी वादविवाद केल्याने कधीकधी आपली शंकानिवृत्ति होऊन आपणास त्यांच्या ज्ञानाचा लाभ होतो. त्यांचे विचार आपणास कळतात व त्यांनाही आपल्या ज्ञानाचा फायदा मिळतो. आपले विचार नेहमीं खरे आणि बरोबरच असतास असें नाहीं. मित्रां- बरोबर त्यांविषयीं ऊहापोह केल्यानें त्या विचारांत सत्य भाग किती आणि असत्य किती, हें तेव्हांच कळून येतें. ' वादे वादे जायते तत्वबोधः' ही ह्मण सर्वत्र प्रसिद्ध आहे.

 अवलोकनांत किंवा ग्रंथवाचनांत आपणास ज्या शंका येतात, त्यांचे निरसन गुरूंशी किंवा मित्रांशी संवाद केल्यानें तेव्हांच होतें. कोणत्याही विषयासंबंधाने आपण विचार करीत असतांना आपणांस अनेक शंका येतात व आपले मन अगदीं गोंधळून जातें. एखाद्या प्रचंड खडकाप्रमाणे त्या आपणास दुर्गम वाटून आपले सर्व विचार ठिकच्याठिकाणीं लुटपुटतात, आपली मति कुंठित होते, अशा स्थितीत आपणापेक्षां ज्ञानानें जो श्रेष्ठ अशा मनुष्याजवळ जाऊन त्यास आपले विचार कळवून, त्याजकडून