पान:वाचन.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ज्ञानार्जनाची पांच साधनें.

 प्राचीनकाळी गुरूस अतिशय मान मिळत असे. याचें कारण हैं कीं, पूर्वी ग्रंथ फार दुर्मिळ असल्यामुळे विद्वान् लोकांस ते पाठ करावे लागत असत. हल्लींप्रमाणे तेव्हां ग्रंथलेखनाची प्रवृत्ति नसल्यामुळे, नवीन सुचलेले विचार विद्वान् लोक तोंडींच एक- मेकांस कळवीत असत. अशा रीतीनें सर्व ज्ञानभांडार तोंडींच असल्यामुळे तें शिकण्यास गुरूचीच आवश्यकता असून गुरु- शिष्यपरंपरेनें तें अस्तित्वांत रहात असे. उदाहरणार्थ, वेद है। जगांतील आद्य धर्मग्रंथ असून ते आज शेंकडों वर्षे केवळ ब्राह्म- णांच्या जिव्हाग्रीं होते. गुरुशिष्यपरंपरेमुळेंच ते अस्तित्वांत राहिले आहेत. उपनिषद्ग्रंथ गुरुशिष्यसंवादरूपानें लिहिलेले आहेत. ग्रीक तत्ववेत्ता साक्रेटीस हा संवादरूपानें आपल्या शिष्यवर्गास बोध करीत असे. यावरून गुरुशिष्यसंवादाचें पूर्वी केवढें महत्व होतें, याची साक्ष आज सहज पटत आहे.

 अलीकडे छापण्याची कला निघाल्यापासून ग्रंथांची समृद्धि झाली असून गोरगरिबांससुद्धां ग्रंथ सुलभ झाले आहेत. परंतु त्यामुळे आतां गुरुमुखाची गरज राहिली नाहीं, असें मुळींच नाहीं. विद्यार्थ्यांस शंका आली कीं, तिची निवृत्ति करण्यास व विवेचन करून विषय समजावून सांगण्यास गुरूची आवश्यकता आहेच. एकाद्या किर्र झाडीच्या भयाण जंगलांतून आपणास


 * यामुळेच ब्राह्मणांस वेदमूर्ति ह्मणण्याचा प्रघात पडला असावा असें दिसतें.

  • सद्गुरुविण ज्ञान कांहीं । सर्वथा होणार नाहीं ॥

अज्ञान प्राणी प्रवाहीं । वाहतचि गेले ॥ १ ॥
सद्गुरूविण जन्म निर्फळ । सद्गुरुविण दुःख सकळ ।
सद्गुरुविण तळमळ । जाणार नाहीं ॥ २ ॥- रामदास.