पान:वाचन.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचन.

सर आयझाक न्यूटन यानें पाहिलें; तेव्हां त्यानें गुरुत्वाकर्ष- णाचा महत्वाचा नियम शोधून काढला. चुलीवर पदार्थ शिजत असतांना वाफेनें भांड्यावरील झांकण हालतें, ही गोष्ट दररोज पुष्कळांच्या पाहण्यांत आली होती. परंतु, त्यावरून वाफेच्या यंत्राचा शोध लावून मनुष्यप्राण्यांच्या सुखांत भर घालण्याचें श्रेय जेम्स वॉट यानें घेतलें. गाईच्या आंचळावरील देवी पाहून डॉक्टर जेन्नर यानें गोस्तनदेवीचा शोध लाविला ! अशा रीतीनें लहानसहान गोष्टींवरून मोठमोठे शोध लागले आहेत. हैं कशाचें फळ १ अर्थात् अवलोकनाचें !
 २ संवाद. - ज्ञानाने जे आपल्या बरोबरीचे किंवा आपल्यापेक्षां श्रेष्ठ असतात, अशा लोकांशी एकाद्या विषयावर बोललें असतांना दोन फायदे होतात. (१) आपलीं मतें चुकीचीं आहेत किंवा बरोबर आहेत, हैं कसोटीस लावून पाहतां येतें. ( २ ) आणि आपणांस अधिक ज्ञान प्राप्त होतें. ठिकठिकाणीं गुरूविषयीं विशेष वर्णन गुरु हे जिवंत विचारांचें भांडार होत. आपल्या प्राचीन ग्रंथांत लिहिलेले आढळून येतें. विद्यार्थ्यांची ग्राहकशक्ति पाहून किंवा त्यांच्या विचारांची मजल कोठवर जात आहे, हें पाहून ते उपदेश करितात. मनुष्यमात्रांस अगदी एकाच लांबीरुंदीचे कपडे घालूं ह्मटल्यास तें झणणें अगदीं हास्यास्पद होईल; इतकेंच नाहीं, तर तसे करणेही अशक्य होईल. त्याप्रमाणे सद्बोधाचें आहे. मनुष्याचा अधिकार पाहून त्याप्रमाणे त्यास बोध केला पाहिजे. पाठ सांगतेवेळीं गुरु प्रथम आपल्या शिष्याच्या शंकांचें समाधान करितो, व नंतर त्यास पाठ चांगल्या रीतीने समजावून सांगतो. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे शिक्षण अगदीं पायाशुद्ध होतें. लहानपणी गुरुमुखाची फार आवश्यकता असते, गुरुमुखा शिवाय कोणत्याही विषयांत प्रवेश होणे अगदी अशक्य होय.