पान:वाचन.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ज्ञानार्जनाची पांच साधनें.

तत्वांपासून सुद्धां तो काम करून घेत आहे. विद्युत्, वाफ, ग्यास इत्यादि अज्ञातशक्ति शोधून काढून त्यांच्या साहाय्याने अनेक उपयुक्त कामें करून घेत आहे. आकाशाच्या पोकळीत, पृथ्वीच्या पाठीवर किंवा पोटांत काय आहे, यांविषयीं त्यानें बरीच माहिती मिळविली आहे; व अधिक माहिती मिळविण्याची खटपट चालू आहे. या व इतर अनेक गोष्टी त्यास साध्य झाल्या आहेत, याचे सुख्य कारण काय ? - तर ज्ञान.


भाग २ रा.

ज्ञानार्जनाची पांच साधनें.

विद्यार्थ्यानी खालीं सांगितलेल्या पांच साधनांच्या द्वारें हा नार्जनाचा प्रयत्न केला असतां वाचनापासून मिळणाऱ्या ज्ञानाची फलप्राप्ति व पूर्णता अधिक होणार आहे. ज्ञान मिळ- विण्याची एकंदर पांच साधनें असून, त्यांपैकीच वाचन हैं एक साधन होय. वाचनाविषयीं लिहावयाचें हाटलें ह्मणजे तदितर जी ज्ञानार्जनाची चार साधनें आहेत, त्यांविषयीं प्रथम थोडेसें सांगणे अवश्य आहे. ह्मणजे वाचन हैं किती सुलभ व उत्तम साधन आहे, हें वाचकांस सहज कळून येईल. शिवाय एकाच वेळीं दुसऱ्या सर्व साधनांचा नेहमीं उपयोग करून घेत गेल्यानें वाचकांस विशेष फायदा होईल. ( १ ) अवलोकन, (२) संवाद, (३) वाचन, (४) भाषण आणि ( ५ ) मनन हीं ज्ञानार्जनाचीं पांच साधनें होत. या पांच साधनांच्या द्वारे ज्ञान मिळविण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे.
 १. अवलोकन. --- आपण स्वतःविषयीं, दुसऱ्यांविषयी किंवा जगांतील कोणत्याही गोष्टीविषयी जे मनःपूर्वक व बारीक रीतीनें