पान:वाचन.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ज्ञानाची महती

करितात. परंतु त्यांपलीकडे त्यांना ज्ञान नसतें. जग हैं काय आहे; त्यांतील वस्तुसंग्रह किती उपयुक्त आहे; ज्ञानभांडार केवढे प्रचंड आहे; मागल्या काळचे लोक कसे होते; वगैरे गोष्टींचं त्यांना कधींच ज्ञान होत नाहीं. परंतु, परमेश्वरानें मनु- याला बुद्धि नामक जी अमोल देणगी दिली आहे, तिच्या योगानें त्यास वरील गोष्टी समजतात इतकेंच नाहीं, तर याहीपेक्षां अज्ञात व दुर्बोध अशा अनेक गोष्टींचे ज्ञान त्याला करून घेतां येतें. परमेश्वराच्या खालोखाल मनुष्याची योग्यता मानली जात आहे, याचें कारण फक्त त्याची अमोल बुद्धिच होय.
 ज्ञान हें विद्याध्ययनापासून मिळतें. विद्याध्ययनापासून जे अनेक फायदे होतात, त्यांचे लॉर्ड बेकन यानें फार उत्तम रीतीनें वर्णन केले आहे. तो हाणतो कीं, "विद्याध्ययनापासून मनाला आनंद होतो. भाषणाला शोभा येते व बुद्धिही वाढते. एकांतवासांत व निवांतस्थळीं असतांना, मनाची करमणूक कर- ण्याला विद्या हेंच मुख्य साधन होय. आपलें संभाषण खुलवून देण्याला विद्या ही फार उपयोगी पडते. तसेंच एखाद्या कामाचा विचार करून त्याची जेथल्या तेथें व्यवस्था करितां येण्याला तिचा फार उपयोग होतो.
 विद्याध्ययनानें स्वाभाविक गुण पक्क होतात आणि अनुभवानें विद्याध्ययन पक्क होतें. कारण आंगची बुद्धि ही आपोआप उगवलेल्या झाडाप्रमाणें आहे. त्या झाडाची खच्ची केल्यानें तें जसें जोमदार होतें, तसें आंगच्या बुद्धीवर विद्येचें कलम केल्याने तीही बळकट व वृद्धिंगत होते. कावेबाज लोक विद्येचा धिक्कार करितात, साधैभोळे लोक तिचें कौतुक करितात व शहाणे लोक तिचा उपयोग करितात,