९५
एपिक्टिस याने एके ठिकाणी हाटलें आहे की, "तुझी अपल्या घरांची छपरे उंच न करितां स्वजनांचीं मनें उदात्त कराल तर राष्ट्राची सर्वात मोठी कामगिरी केल्यासारखे होईल. " स्त्रीपुरुष, आबालवृद्ध इत्यादि सर्वांस ज्ञानामृताचा लाभ देणें व त्यांना सन्मार्गास लावणें, यासारखे श्रेयस्कर अन्य कृत्य असेल, असें. आम्हांला वाटत नाहीं. आपल्या देशांत स्त्रियांच्या शिक्षणाची फारच हेळसांड होत आहे व ती जोपर्यंत अशीच चालू राहील, तोपर्यंत आपले नष्टचर्य कधींही संपावयाचें नाहीं. स्त्रीपुरुष ही संसारांतील दोन मुख्य अंगें असून तीं दोन्हींही बरोबर व एकमेकांस शोभतील अशींच असली पाहिजेत. परंतु हल्ली आमच्या समाजाचें एक अंग अगदीं बधिर अतएव निरुपयोगी झाले आहे. स्त्रीस ‘घरांतील लक्ष्मी' असे म्हणण्याचा आम- च्यांत प्रघात आहे. परंतु विद्येचें भूषण असल्याशिवाय तिला लक्ष्मीपण कधीही येणार नाहीं. आई सुशिक्षित असली ह्मणजे तिच्या शिक्षणाचा प्रभाव मुलांवर पडून तीं उत्तम निपजतात. जार्ज हर्बर्ट यानें ह्यटलें आहे. " सुशिक्षण देण्याच्या कामी एक चांगली आई जितकी उपयोगी पडते तितके शंभर चांगले शिक्षक उपयोगी पडत नाहींत.” “ मनुष्य कोटींत जी सुधारणा आपण पाहतों ती सुशील स्त्रियांच्या आचरण प्रभावाचें फल होय, " असें एमर्सन नामक तत्ववेत्याने म्हटलें आहे. आपल्या देशांत स्त्री शिक्षणाचा जेव्हां सर्वत्र प्रसार होईल, तेव्हांच गृहशिक्षणाची उत्तम व्यवस्था होईल व गृहशिक्षणाची उत्तम व्यवस्था झाल्या- शिवाय आपल्या राष्ट्राचें पाऊल पुढे पडण्याची फारशी आशा नाहीं. गृहशिक्षणाचे महत्व केवढे आहे, याविषयीं वर उल्लेख आलाच आहे. असो.
वाचन म्हटले की अगोदर ग्रंथसंग्रह उत्तम पाहिजे व तो नेहमी कालास अनुसरून पाहिजे, ज्या भाषेत उत्तम प्रकारचा