ग्रंथसंग्रह नाहीं तेथें वाचनासारखें ज्ञानार्जनाचें उत्तम साधन व्यर्थ होय ! पाश्चात्य देशांत ज्ञानोत्कर्ष कालापासून ( Rena- issance period ) देशी भाषेतील ग्रंथसंग्रह झपाट्याने वाढत आहे आणि शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे किंवा शिक्षण सक्तीचें झाल्यामुळे वाचनाची अभिरुचि सर्वत्र अति वाढली आहे. त्यामुळे मनोरंजक, अनुभवपरिप्लुत, सन्मार्गदर्शक आणि बोधपर अशा प्रकारचा पुस्तक संग्रह प्रत्येक देशांत निर्माण झाला आहे. पाश्चात्य लोकांची जी विशेष प्रगति झाली आहे तीस ह्या ज्ञानो- स्कर्ष काळापासून मोठी मदत झाली आहे, यांत संशय नाहीं. मनु- ध्याला वस्तुस्थितीचे पूर्ण ज्ञान झाल्याशिवाय त्याचीं मतें सुनिश्चित होत नाहीत. परस्परांत ऐक्य होत नाहीं आणि परिस्थितीचें यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय प्रगतिही होत नाहीं. पाश्चात्य देशांप्रमाणे आपल्या देशांत ज्ञानाचा प्रसार व्हावा, अशी जर आपली मनःपूर्वक इच्छा असेल तर शिक्षणाचा प्रसार झपाट्याने वाढला पाहिजे घ देशी भाषेत उत्तम प्रकारचा ग्रंथसंग्रह झाला पाहिजे. याकडे आमच्या दयाळु सरकाराचें व तसेंच सुशिक्षित मंडळीचें अवश्य लक्ष्य जाईल अशी दृढतर आशा आहे.
पान:वाचन.pdf/१०४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
वाचन