पान:वाचन.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
वाचन

वाढवावी. स्वतःच्या प्रयत्नाने विद्यासंपादन करून नावारूपास चढलेले असे अनेक लोक आपण जगांत पाहतों. साक्रेटिस, प्लेटो, तुकाराम, अकबर, आब्राहाम लिंकन वगैरे लोकोत्तर पुरुषांचें लहानपणचें शिक्षण हाणण्यासारखे जरी नव्हते, तरीपण मुढें स्वप्रयत्नानें ज्ञानसंपादन करून त्यांनी आपणांस विद्वान् हणवून घेतलें. 'स्वत: कळकळीनें मनुष्य जें ज्ञान संपादन करतों तें त्यास उत्तम साध्य होतें, असें एका आंग्ल ग्रंथकाराने हाटले आहे. शिक्षणक्रम संपवून मनुष्य व्यवहारांत पडल्यावरही त्याने वाच नाची संवय ठेविली असतां त्यापासून त्याला ज्ञान व करमणूक हीं दोन्हींही होतील व त्याच्या वर्तनावर त्या वाचनाचा दृष्ट परिणाम झाल्याखेरीज राहणार नाहीं.
 शिक्षणाचा प्रसार आपल्या देशांत अझून व्हावा तसा झाला नसल्यामुळे आपल्या लोकांना ज्ञानाचें फार महत्व कळत नाहीं. तें कळण्यास राष्ट्रांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे व वाचनाची अभिरुचि सर्व दर्जाच्या लोकांत उत्पन्न झाली पाहिजे. पाश्चात्य देशांत राजे, मुत्सद्दी, जमीनदार, शेतकरी, व्यापारी, उदमी, मजूर वगैरे सर्व लोकांस लिहिणे, वाचणे येत असल्या- मुळे आपला व्यवसाय आटोपल्यावर विश्रांतीचा वेळ ते आळसांत किंवा उपद्व्याप करण्यांत न घालवितां, वर्तमानपत्रे, मासिकपुस्तकें, कादंबऱ्या, निबंध, धर्मपर व्याख्याने वगैरे वाच - यांत घालवितात. आपल्या मंडळींत त्यांविषयी चर्चाी वगैरे करितात. यामुळे त्यांना सामान्य व्यावहारिक ज्ञान बरेंच होतें. गोरगरिबांकरितां वाचनाच्या अनेक सोयी करण्यांत आल्या असून त्यांना वरिष्ठ शिक्षणाचा लाभ व्हावा ह्मणून उच्च शिक्षणाचे वर्ग ( University extension classes ) काढण्यांत आले आहेत. त्यामुळे गरीब लोकांपैकी ज्यांना ज्यांना ज्ञानार्जनाची उत्कंठा असते, त्यांना अशा संस्थांपासून बरास लाभ होतो. अशा प्रकारची स्थिति आपल्या देशांत जेव्हां होईल तेव्हांच आपला उत्कर्ष होईल,