पान:वाचन.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपसंहार.

९३

असतै. ठरीव अभ्यास सर्वाकडून करवून घेण्यांतच शिक्षकाचा वेळ जात असल्यामुळे मुलांच्या मनोवृत्तींची योग्य वाढ होत आहे कीं नाहीं, हें पाहण्यास त्यांना मुळींच फुरसद होत नाहीं. मग व्यक्तिशः त्यांची जिज्ञासा तृप्त करण्याची व त्यांना कळक- ळीनें उपदेश करण्याची गोष्टच नको. अशी जरी स्थिति आहे, तरी मुलांची जिज्ञासा तृप्त केली पाहिजे. त्यांना योग्य उपदेश करीत गेलें पाहिजे. त्यांना वाचनाची गोडी लावून त्यांच्या ठायीं विद्येची अभिरुचि उत्पन्न केली पाहिजे. आपल्या देशांत गृह- शिक्षणाची हेळसांड होत आहे, ही गोष्ट ध्यानांत ठेवून आपणां- कडून मुलांना जितका उपदेश होईल तितका शिक्षकांनी केला पाहिजे. शिक्षकाचें काम हैं महा पवित्र व मोठ्या जबाबदारीचें आहे; ही गोष्ट निरंतर मनांत बाळगून त्यानीं मोठ्या कळक- ळीने मुलांचीं मनें सुसंस्कृत करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केला पाहिजे. याप्रमाणें मुलांच्याठायीं वाचनाभिरुचि -विद्या- भिरुचि - उत्पन्न झाली तर ती पुढें वृद्धिंगत होईल व त्यांनी लाविलेल्या सुंदर रोप्यास पुढे मधुर फळें आल्यावांचून राह णार नाहींत, हैं उघड आहे.
 लहानपण उत्तम शिक्षण मिळणे व पुढें विद्वान् व सहृदय शिक्षकांचा सहवास घडणें या गोष्टी दैवाधीन होत ! त्या सर्वा- नाच लाभतात असें नाहीं. ज्यांना त्या लाभतात व जे त्यांचा फायदा घेतात व त्या उपदेशाप्रमाणें पुढें वर्तन चालू ठेवितात, त्यांना आपल्या आयुष्यक्रमांत अनेक प्रकारचा फायदा होतो; इतकेंच नाहीं तर त्यांचें अनुकरणीय वर्तन पाहून इतर लोकांना त्यांच्याप्रमाणें वागण्याची प्रेरणा होते. परंतु दुर्दैवानें ज्यांना पूर्ववयांत गृहशिक्षणाचा लाभ मिळाला नाहीं किंवा सहृदय शिक्षकांचा सहवास घडला नाहीं, अशा लोकांनींही निराश होण्याचें कांहीं कारण नाहीं. त्यांनी स्वतःच विद्यार्जनाच्या प्रयत्नास लागावें व निश्चयाने प्रयत्न चालवून आपली योग्यता