जवळचे मित्र होते व ते वेळोवेळी सल्लामसलतीसाठी आनंदाने तयार असत. स्वतः शंतनुरावांनी घाटगे-पाटलांना कायम प्रोत्साहन दिले. सुरुवातीला बरेचसे कामही किर्लोस्कर कंपन्या देत. अर्थात त्यांनाही चांगले सप्लायर हवेच होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात घाटगे- पाटलांचा स्वाभाविक विस्तार होऊ शकला. व्यावसायिक संबंध हे केवळ व्यावसायिक संबंध कधीच राहत नाहीत. सुरुवातीला जरी गाठी-भेटी व्यावसायिक कारणांसाठी होत गेल्या तरी नंतर त्यांना व्यक्तिगत स्नेहाचा पदर लाभतोच. आर्थिक हितसंबंध जोडलेले असणे हेही मैत्री दृढ होण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे घाटगे-पाटील आणि किर्लोस्कर जवळ येत गेले, ह्यात नवल काहीच नव्हते. व्यक्तिगत पातळीवर विचार केला तर शंतनुराव हे वसंतरावांसाठी जणू एक रोल मॉडेल होते, असेही म्हणता येईल. पुढे सखारामपंतांची ज्येष्ठ कन्या शशिकला व शंतनुराव किर्लोस्करांचे द्वितीय चिरंजीव श्रीकांत यांचे डिसेंबर १९५७मध्ये लपग्रही झाल्याने दोन्ही कुटुंबांत आता नात्याचे बंधही निर्माण झाले. वसंतरावांप्रमाणे जयकुमार पाटील यांच्या कुटुंबाचेही किर्लोस्कर कुटुंबाशी नाते जोडले गेले हेही नमूद करायला हवे. किर्लोस्कर कंपन्यांव्यतिरिक्त ऑटोमोबाईल व्यवसायातील इतरही वेगवेगळ्या कंपन्यांशी वसंतरावांचे जुळलेले नातेही घाटगे-पाटील इंडस्ट्रीच्या विस्तारात महत्त्वाचे ठरले. एकेका वाहनांत शेकडो पार्ट्स असतात. त्यातले बहुतेक पार्ट्स वाहने बनवणारी कंपनी स्वतः बनवत नाही; वेगवेगळ्या अॅन्सिलरी इंडस्ट्रीजकडून ते खरेदी केले जातात. त्यातून स्वतःच त्यातले काही पार्ट्स बनवायची प्रेरणा वसंतरावांमध्ये स्वाभाविकच निर्माण झाली. पुढे त्या दृष्टीने वेगवेगळ्या परदेशी कंपन्यांशी बोलणी करून त्यांची उत्पादने भारतात बनवायला वसंतरावांनी सुरुवात केली. ही उत्पादने पूर्वी परदेशातून येत असत व ती देशांतर्गतच बनवणे खूप फायदेशीर ठरले. हे ही एक प्रकारचे 'मेक इन इंडिया'च होते. सुरुवातीला घाटगे-पाटील उद्योगात कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. त्या वेळी अवघे ३० कर्मचारी होते. जसजसा व्यवसाय वाढत गेला, तसतशी ही संख्याही वाढत गेली. १९६५ साली कर्मचाऱ्यांची संख्या उद्योगभरारी | ८५ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/८७
Appearance