Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाली नाहीत, आपले घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचवू शकली नाहीत, ही बाब त्यांच्या जीवाला खूप लागली. स्वतः माधवरावांनी तिथल्या गरीब शेतकऱ्यांकरिता खूप काही केले होते; तरीही हीच माणसे अशी आपल्यावर उलटावी हे त्यांना सहन होईना. त्यानंतर लौकरच, १९४८ सालीच, ते वारले. वयाच्या ६२व्या वर्षी. आपली आयुष्याच्या उत्तरार्थातील कोल्हापुरातील १९३६ ते १९४८ ही बारा वर्षे माधवरावांनी ऊर्फ दादांनी सुखात काढली. वसंतरावांनी व्यवसाय करणे दादांना तितकेसे पसंत होते असे नाही, त्यांचा कल मुलांनी प्राध्यापक बनावे असाच होता; पण त्याचबरोबर मुलांनी मनापासून काही करायचे ठरवले, तर त्यांना तसे करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे, अशी दादांची भूमिका होती. शिवाय टीबीपासून सुटका झाल्यावर वसंतराव वेगळे काहीतरी करू पाहत आहेत, ह्याचाही त्यांना अभिमान वाटू लागला. जसजसा वसंतरावांचा व्यवसायात जम बसत गेला तसतशी त्यांची पावले योग्य दिशेने पडत आहेत ह्याची दादांना खात्री पटत गेली. वसंतरावांनी वेगवेगळ्या मोटारींची एजन्सी घेतल्यावर गावातील त्यांची प्रतिष्ठाही खूप वाढत गेली. बड्या बड्या लोकांशी आधी ग्राहक म्हणून व मग मित्र म्हणून संबंध येत गेला. दादांचीही सामाजिक प्रतिष्ठा त्यामुळे वाढत होती. एक विद्वान म्हणून माथवरावांना कोल्हापुरात मान होताच. गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी दादांच्या घरी येत असत. त्यांच्याशी गप्पा मारण्यात, त्यांचे आदरातिथ्य करण्यात, तसेच मुलांच्या संसारात शक्य तिथे मदत करण्यात दादा आणि मत्याक्कांचा वेळ आनंदात जाई. एकूण आपल्या जीवनात ह्या सगळ्यामुळे दादा आणि मत्याक्का अगदी तृप्त होते. हसूरचंपू सोडून कोल्हापूरला मुक्कामाला आलो, याचे सार्थक झाले अशीच त्यांची भावना होती. या सान्याला गालबोट लागले ते १९४८मधल्या त्या दुर्दैवी दंगलींमुळे. दादा गेल्यानंतरही १९६७पर्यंत मत्याका कार्यरत होत्या. ही मधली एकोणीस वर्षे विधवा असूनही त्यांनी सगळी शेती व घर यांचा उत्तम सांभाळ केला. तत्कालीन रूढीप्रमाणे त्या असायच्या आलवणात (लाल वस्त्र लेऊन), पण सगळीकडे त्यांचे लक्ष असायचे. स्वभाव अतिशय करारी, त्यामुळे त्यांच्याशी लबाडी करायचे धाडस कोणी करत नसे. वसंतवैभव । ६८ । ,