साखरवाडीचे माधवराव आपटे, सांगलीचे धनी वेलणकर, ओगलेवाडीचे ओगले, सांगलीचेच आबासाहेब कुलकर्णी खेबूडकर, माधवनगरचे नातू - दिवेकर, इचलकरंजीचे भिडे वगैरे या परिसरातील बहुतेक सर्व ब्राह्मण उद्योगपतींचे फार मोठे नुकसान ह्या ब्राह्मणविरोधी दंगलीत झाले. सुदैवाने कोल्हापुरातील घाटगे-पाटील यांचा व्यवसाय मात्र ह्या दंगलीत वाचला. असे म्हणतात, की जेव्हा एक हिंसक जमाव घाटगे- पाटलांचे राजाराम रोडवरचे कार्यालय लुटण्यासाठी चाल करून आला होता, त्या वेळी तिथल्या कामगारांनीच त्या जमावाला कसेबसे समजावून परत पाठवले होते व कार्यालयाला कसलीही इजा पोहोचू दिली नव्हती. आपल्या कामगारांशी वसंतरावांनी उत्तम संबंध राखले होते व त्याचे हे बहुधा फळ असावे. ह्या दंगलीच्या वेळी पोचली नाही तशीच त्यानंतरही कधी त्या परिसरातील ब्राह्मणविरोधी वातावरणाची फारशी झळ घाटगे-पाटलांच्या व्यवसायाला पोचली नाही. कदाचित घाटगे-पाटील या नावाचा त्यांना फायदा मिळाला असेल. जुनं कोल्हापूर या आपल्या पूर्वी उल्लेख केलेल्या पुस्तकातील 'घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट' या आपल्या लेखात माजी आमदार बाबूराव धारवाडे यांनी लिहिले आहे (पृष्ठ १८७) : “घाटगे- पाटील आणि कोल्हापूरचे उद्योगपती म्हणजे कोल्हापूर संस्थानातील कोणीतरी ९६ कुळी मराठा समाजाची माणसे असतील, असा साऱ्या महाराष्ट्राचा समज होता. " 22 परंतु घाटगे कुटुंबाचा हसूरचंपूमधील वडिलोपार्जित वाडा मात्र गांधी हत्येनंतरच्या जाळपोळीत जाळला गेला. स्थानिक लोकांना घाटगे हे ब्राह्मण आहेत ह, अर्थातच ठाऊक होते. वाड्याच्या मूळच्या पांढऱ्या मातीच्या भिंती तब्बल अडीच फूट जाडीच्या असल्याने त्या तेवढ्या सुरक्षित राहिल्या; पण वाड्यातील बाकी सारे सामानसुमान जळून खाक झाले. वर्षभरासाठी साठवलेले सगळे थान्यही जळून खाक झाले. या घटनेचा त्या वेळी सुदैवाने कोल्हापुरात असलेल्या व बहुधा त्यामुळे स्वतःचा जीव बचावलेल्या माधवरावांना खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यांच्या कित्येक पिढ्या त्याच घरात राहिल्या होत्या, त्या परिसराशी त्यांचे जिवाभावाचे नाते होते. इतकी वर्षे ज्यांना आपण आपले मानले ती माणसेही अशा अडचणीच्या वेळी आपल्या मदतीसाठी पुढे गाडी सुरू करताना । ६७ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/६९
Appearance