त्यांच्या शेतात उन्स, हळद, भुईमूग, ज्वारी व्हायची. भात व्हायचा. आंब्याची १०० झाडे होती. दरसाल चांगले १०,००० आंबे यायचे. त्यातले जे विकले जात नसत ते कोल्हापुरात पाठवले जात. त्या मोसमात घरच्यांची अगदी चैन असायची. सकाळ-संध्याकाळ सगळी मुले आंब्यावर अगदी ताव मारायची. मोठी मुले शिक्षणानिमित्त बंगलोर, पुणे, धारवाड, बेळगाव अशा ठिकाणी असायची; पण उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र सगळ्यांनी कोल्हापुरात घरी एकत्र जमायचे; हा संकेत अगदी नियमित पाळला जाई. मत्याक्का जेव्हा हसूरचंपू आणि कोल्हापूर यांच्यामध्ये जा-ये करायच्या तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे १६-१७ ट्रंका भरून सामान असायचे आणि ती सगळी व्यवस्था त्यांचे विश्वासू कारभारी गणपतराव केसरीकर करायचे. विष्णुपंत व त्यांचे कुटुंब तेव्हा बंगलोरला स्थायिक झाले होते, पण कोल्हापुरात ह्याच काळात सखारामपंत, अमृतराव आणि वसंतराव यांची मुले एकत्रच मोठी झाली; त्यांचेही संसार फुलत गेले. सगळ्यांचे व्यवसाय उत्तम चालत असल्याने वाढते आर्थिक सुखही वाट्याला ये गेले. एक ट्रक सुमारे तीस जणांना रोजगार पुरवतो असे म्हणतात. खरे तर कुठल्याही छोट्या गावात एखादी ऑटो रिक्षा आली तरी खूप फरक पडतो. ट्रकमुळे पडणारा फरक हा कितीतरी अधिक असतो. ट्रकवर नोकरी करणारा ड्रायव्हर व क्लीनर हा केवळ ह्या व्यवसायाचा पटकन दिसणारा भाग झाला; पण ट्रक दुरुस्त करणारे, स्पेअर पार्ट्स विकणारे, ट्रकमधील मालाची चढउतार करणारे, तो माल जिथे साठवला जातो तिथे काम करणारे असे अनेक लोक ह्या व्यवसायावर अवलंबून असतात. कच्चा माल कारखान्यात पोचणे आणि तिथे तयार झालेला पक्का माल सर्वदूर विखुरलेल्या बाजारपेठेत पोचणे ह्यावरच सगळा उद्योग, सगळा व्यापार अवलंबून असतो. म्हणूनच जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालाची ने-आण होते, तेव्हा आपोआपच विकासालाही चालना मिळत असते. सुरुवातीच्या त्या वर्षांत केलेल्या आपल्या अपार कष्टांतून घाटगे- पाटलांनी कंपनीची पायाभरणी तर केलीच; पण त्याच जोडीने त्यांनी त्या सगळ्या परिसरात विकासाचे एक चक्रही सुरू केले. ट्रक हा व्यापक सामाजिक परिवर्तनाचा अग्रदूत ठरला. -*OA गाडी सुरू करताना । ६९ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/७१
Appearance