पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांचे एक नातू (नलिनी व महेश यांचे चिरंजीव) डॉ. मिहिर अमेरिकेत स्थायिक झाले असून आपल्या वडिलांप्रमाणेच उत्तम युरोलॉजिस्ट आहेत. आपल्या आजोबांविषयी ते म्हणतात, “प्रत्येक गोष्ट पूर्ण एकाग्रतेने आणि जास्तीत जास्त उत्तम प्रकारे करणं हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य होतं. त्यांच्यापासून आम्ही ते शिकलो. मला आठवतं, त्यांना गोल्फ हा खेळ खूप आवडायचा आणि लहानपणापासूनच ते गोल्फ खेळायचा जाताना मीही त्यांच्याबरोबर जायचो. माझ्या हातात ते गोल्फची क्लब (काठी) द्यायचे आणि मला गोल्फ कसा खेळायचा ते दाखवायचे; पण तेव्हाही मी कसंतरी खेळायचं, कसातरी चेंडू टोलवायचा हे त्यांना अजिबात पसंत नसे. ते मला लिंबू-टिंबू न मानता नेहमी योग्य प्रकारे क्लब कशी वापरायची आणि गोल्फ कसा खेळायचा ते शिकवत. आम्ही खूपदा एकत्र गोल्फ खेळायचो. खेळ असला म्हणून काय झालं, कुठलीच गोष्ट कशीतरी करणं त्यांना पसंत नव्हतं. हा त्यांचा मोठा गुण होता. " प्रकृतीची जराही साथ नसताना १९८५च्या सुमारास वसंतरावांनी जिद्दीने आधी ऑस्ट्रेलियाचा व तिथून पुढे अमेरिकेचा प्रदीर्घ प्रवास केवळ एकट्याने केला होता. ऑस्ट्रेलियात ते डॉ. महेश देसाई यांच्या एका मित्राच्या घरी सिडनी येथे राहिले होते. तेथून ते हवाईमार्गे अमेरिकेत गेले. बोस्टन, शिकागो वगैरे ठिकाणी ते राहिले. तिथे सतीश आणि जयकुमार यांचे दोन मुलगे किरण आणि नितीन यांना ते भेटले. प्रवासातल्या अनेक अडचणींवर जिद्दीने मात करत त्यांनी तो पार पाडला. स्वतःच्या दुखण्यातही वसंतरावांच्या स्वभावातील इतरांबद्दलची संवेदनशीलता कायम होती. त्यांचे हे एक वेगळेपण मानता येईल. डॉक्टर विवेक हळदवणेकर हे कोल्हापुरातील वसंतरावांचे व्यक्तिगत डॉक्टर; त्यांच्या अगदी विश्वासातले. ते म्हणतात, "माझा आणि वसंतराव घाटगे यांचा संबंध मी त्यांच्या घाटगे-पाटील कंपनीत डॉक्टर म्हणून काम करू लागलो तेव्हापासून यायला लागला. त्यापूर्वी डॉ. आर. ए. बिदरी हे घाटगे कुटुंबाचे डॉक्टर होते. त्यांच्या घरची सगळी आजारपणं डॉ. बिदरी यांनीच निभवली होती. सुरुवातीला अर्थातच आमचा संबंध कारखान्यातच यायचा. पुढे वसंतरावांचा व्यक्तिगत डॉक्टर म्हणूनही मी काम पाहू लागलो. माझ्यावर त्यांचा फार विश्वास होता. त्यांना Thrombosis, म्हणजे रक्तात गुठळी होणं, हा एक विकार सांजसावल्या | २२१ |