होता. ती गुठळी शरीरभर फिरत राहायची. Embolism म्हणतात त्याला. त्यांच्या रक्तवाहिन्या ठिसूळ झाल्या होत्या. त्यांना सायटिकाचं दुखणं होतं. त्याच्या वेदना फार होत; पण त्या सहन करीत. त्यांच्या तब्येतीच्या अनेक तक्रारी होत्या. मला आठवतं, तीन वेगवेगळे नंबर असलेला विशिष्ट चष्मा होता त्यांचा. तो खास जर्मनीहून त्यांनी मागवला होता. "शुगर व प्लेटलेट्स बघण्यासाठी त्यांची वरचेवर ब्लड टेस्ट करावी लागे. बाकीच्यांना रक्त काढण्यासाठी त्यांची नस नेमकी सापडत नसे व त्यांना त्यामुळे फार त्रास होई. मला ते चांगलं जमायचं. त्यामुळे ब्लड काढण्यासाठी मीच त्यांना हवा असायचा. भल्या सकाळी चार वाजता रक्त काढायला मी त्यांच्या घरी जायचो. आश्चर्य म्हणजे माझी खोटी होऊ नये म्हणून इतक्या लौकर उठून, सर्व आवरून, माझ्यासाठी चहा बनवून ते तयार असायचे!” आपल्या आजारपणाचा फारसा उल्लेख वसंतराव बाहेर सहसा करत नसत. जिथे वैद्यकीय इलाज घ्यायचे असतील तिथे अर्थातच वास्तव परिस्थिती नमूद करावी लागे; पण अन्यत्र वसंतराव आपल्या आजारपणाविषयी बोलणे टाळत. 'आपल्याला कुठल्याही परिस्थितीत बरे व्हायचेच आहे, ह्यावर मात करायचीच आहे,' ह्या त्यांच्या एकूण जिद्दीचाच हा एक भाग असावा. आपले दुःख आपणच झेलावे, त्याविषयी बोलून उगाच इतरांना काळजी कशाला लावायची, असाही त्यात दृष्टिकोन असावा. आपल्या आठवणी सांगताना डॉ. नलिनी देसाई यांनी लिहिले आहे, "त्यांचा मृत्यू म्हणजे आम्हांला मिळालेला आश्चर्याचा एक धक्काच होता. असं काही घडेल, याची आम्हांला अजिबात कल्पना नव्हती. त्यांच्या समस्यांबद्दल त्यांच्या मृत्यूनंतर आम्हांला समजलं. हयात असताना त्यांनी आम्हाला कशाचा थांगपत्ता लागू दिला नव्हता. " 2 डॉ. दाते यांच्या आठवणीनुसार त्यांना atherosclerosis ह्या व्याधीने ग्रासले होते. या व्याधीमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकसत जाऊन रक्तपुरवठा मंदावतो. त्यामुळे claudication होते, पायात क्रॅम्प्स यायला लागतात. त्याचा चालण्यावर परिणाम होतो व चालण्याची क्षमताही कमी होते. त्यासाठी पायात अँजिओप्लास्टी करता येते; पण त्या काळात ती तितक्या सहजतः केली जात नव्हती. ह्याच व्याधीमुळे त्यांच्या मेंदूतील रक्तवाहिनी बंद पडून त्यांना स्ट्रोक आला होता; पण त्यातूनही ते जिद्दीने वसंतवैभव | २२२ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२५६
Appearance