Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पिआजिओला ते डिझाइन आवडले व त्यावर आधारित आपली 'वेस्पा' ही स्कूटर त्याने लगेचच, म्हणजे १९४६ साली, बाजारात आणली. इनोसेंटीला आपल्याला अपेक्षित ते बदल घडवून आणायला थोडा वेळ लागला; पण दुसऱ्या दोन प्रसिद्ध एरोनॉटिकल इंजिनिअर्सच्या मदतीने नंतरच्या काही महिन्यांतच, १९४७ साली, त्याने आपली लँब्रेटा ही स्कूटर बाजारात आणली. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनादेखील सहजगत्या चालवता येईल अशी, हाताळायला सोपी, वजनाला हलकी, कमी इंधन वापरणारी आणि खिशाला परवडणारी अशी ही स्कूटर होती. ती अ आणि ४९ सीसीचे टू-स्ट्रोक इंजिन असलेली लँब्रेटा बघता बघता अफाट लोकप्रिय झाली आणि वेस्पाला मागे टाकून लॅब्रेटाने युरोपातील स्कूटरची बाजारपेठ बऱ्यापैकी आपल्या ताब्यात घेतली. पुढे चंद्रावर जायचे अभियान जेव्हा सुरू झाले, तेव्हा इनोसेंटीने आपले 'लुना' (इटालियन भाषेत चंद्र) हे मॉडेल बाजारात आणले व तेही खूप लोकप्रिय ठरले. युरोपात जी परिस्थिती १९४५च्या सुमारास होती, तशीच साधारण परिस्थिती पंचवीस-तीस वर्षांनी म्हणजे सत्तरच्या दशकात भारतात निर्माण होऊ लागली होती; मोटार परवडत नाही; पण स्वतःचे कुठलेतरी स्वयंचलित वाहन हवे आहे, असा एक मोठा वर्ग भारतातही निर्माण होऊ लागला होता. मुंबईत एपीआय ही कंपनी पन्नासच्या दशकात इटलीच्या ब्रेटा स्कूटर्स CKD (Completely Knocked Down) स्वरूपात आयात करून असेम्बल करत असे व घाटगे-पाटील यांच्याकडे त्यांची एजन्सी १९५६ सालापासूनच होती. त्यानंतर १९७२ साली स्कूटर्स इंडिया लिमिटेड ह्या सरकारी कंपनीने लखनौ येथे लँब्रेटा स्कूटर्स बनवायला सुरुवात केली. पुढे काळाच्या ओघात छोट्या व स्वस्त मोटारी बाजारात यायला लागल्यानंतर युरोपात लँब्रेटा बनवणारी इनोसेंटी कंपनी डबघाईला आली होती, ब्रिटिश लेलँड कंपनीने ती विकत घेतली होती व त्यांचाच एक प्लँट • स्कूटर्स इंडियाने जसाच्या तसा भारतात आणून विजय डिलक्स आणि विजय सुपर ह्या नावांनी आपले स्कूटर उत्पादन सुरू केले होते. त्याच • सुमारास बजाज ऑटो कंपनीही ह्या व्यवसायात उतरली. चेतक हे त्यांचे मॉडेल कमालीचे लोकप्रिय ठरले; पुढे ऐंशीच्या दशकात त्यांचीच प्रिया, सुपर वगैरे मॉडेल्सही तशीच लोकप्रिय ठरली. इतरही काही निर्माते ह्या उद्योगात आले. सांजसावल्या | २०१ ।