अनेक घटकांचा तो एकत्रित परिणाम होता. त्या काळात एका विशिष्ट टप्प्यावर स्कूटर ह्या वाहनाची मोठी मागणी युरोपिअन समाजात निर्माण झाली. सायकल आणि मोटार यांच्यामधली ती अवस्था होती. मोटार घेण्याइतकी समृद्धी लोकांमध्ये आली नव्हती; पण त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीच्या जोडीला दुसरे एखादे स्वतःच्या मालकीचे, स्वतःला प्रवासाचे अधिक स्वातंत्र्य देणारे, स्वस्तातले वाहन लोकांना हवे होते. उपलब्ध असलेला सायकलीचा प्रचलित पर्याय जुनाट वाटू लागला होता. युनायटेड स्टेट्समध्ये महायुद्धापूर्वीच नेब्रस्का येथील कुशमन कंपनीच्या स्कूटर्स प्रचलित होत्या व युद्धकाळात इटलीमध्ये अमेरिकेने त्या ऑलिव्ह- ग्रीन रंगाच्या स्कूटर्स मोठ्या प्रमाणात आणल्या होत्या. लष्कराच्या दृष्टीने ते वाहतुकीचे खूप उपयुक्त साधन होते. शत्रूला आपल्या रस्त्यांचा वापर करता येऊ नये म्हणून माघार घेत असताना, आपले रस्ते उद्ध्वस्त करत मागे मागे जायचे जर्मन सैन्याचे धोरण होते व त्यामुळे उरल्यासुरल्या कच्च्या किंवा वेड्यावाकड्या रस्त्यांवरूनही जाऊ शकेल, असे स्कूटर हे वाहन अमेरिकन सैनिक वापरत असत. युद्ध संपल्यावर हे अमेरिकन सैनिक परत गेले; पण त्यांनी वापरलेल्या अशा हजारो स्कूटर्स इटलीत शिल्लक उरल्या होत्या व त्यांना स्थानिक लोकांमध्ये मोठी मागणी होती. ती मागणी डोळ्यांपुढे ठेवून फर्डीनान्डो इनोसेंटी (Ferdinando Innocenti) ह्या इटालियन उद्योगपतीने स्वतः स्कूटरनिर्मितीच्या व्यवसायात उतरायचे ठरवले. त्याची स्वतःची मिलानलगतच्या लांब्रेत (Lamcrate) ह्या भागात स्टील ट्यूब बनवायची मोठी फॅक्टरी होती; पण महायुद्धात ती बेचिराख झाली होती. नव्या कुठल्यातरी व्यवसायाच्या तो शोधात होता. नव्या पद्धतीच्या स्कूटरचे डिझाइन बनवायचे काम त्याने जनरल कोरादिनो द अस्कानिओ (Corradino D'Ascanio) ह्या प्रसिद्ध एरोनॉटिकल इंजिनिअरवर सोपवले. अस्कानिओने त्याप्रमाणे एक डिझाइन तयार केले; पण ते इनोसेंटीला पसंत पडले नाही. इनोसेंटीला स्वतःच्या उरल्यासुरल्या जुन्या स्टील ट्यूब कारखान्यात बनवता येईल, तिथल्या मशीन्सचा उत्पादनात वापर करता येईल, अशा प्रकारचे, रचनेत स्टील ट्यूबचा वापर असलेले वाहन हवे होते. दोघांचे बिनसल्यावर अस्कानिओ आपले डिझाइन घेऊन एब्रिको पिआजिओ ह्या दुसऱ्या एका इटालियन उद्योगपतीकडे गेला. वसंतवैभव | २० |
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२३४
Appearance