Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्या वेळी वसंतरावांशी माझा रोजच संबंध येत असे. माझ्याशी ते अगदी बरोबरीच्या नात्याने बोलत. ते मालक होते; पण मोठेपणाचा जराही अहंकार त्यांच्या वागण्या-बोलण्यात नव्हता. त्यांचा मुलगा मोहन माझ्याबरोबर राजाराम कॉलेजात शिकायला होता. पुढे आमची साहजिकच उत्तम मैत्री झाली. ने “घाटगे पाटील कंपनी हे लॅटेरल डायव्हर्सिफिकेशनचं उत्तम उदाहरण आहे. आधी मालवाहतूक, मग स्पेअर पार्ट्सची विक्री, मग ट्रक व मोटारी विकायची एजन्सी, बसेस, नंतर औद्योगिक उत्पादन वगैरे सगळी वाढ ही अशा एका विशिष्ट सूत्राला धरून झाली आहे. मालवाहतुकीच्या धंद्यात पार्सल सर्व्हिस किंवा परचुटन माल ही त्यांची खासियत होती. अशा पार्सल सर्व्हिसची मोठी गरज समाजात होती आणि ती घाटगे पाटलांनी नेमकी हेरली आणि भागवली हे त्यांचं कर्तृत्व. कुठल्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी अशा प्रकारे योग्य ती संधी हेरणं हे अत्यावश्यक असतं. "माझी स्वतःची पीएच.डी. ही शेतीचे यांत्रिकीकरण (Farm Mechanization) ह्याच विषयात आहे. त्यामुळे ट्रॅक्टर्सची विक्री हा माझा खास आवडीचा विषय होता. तुमची जमीन जर सहा एकर किंवा अधिक असेल तर ट्रॅक्टर वापरून शेतीतलं उत्पादन आश्चर्य वाटेल एवढं वाढायचं. तशी जमीन असलेले कोल्हापुरात खूप शेतकरी होते; पण ट्रॅक्टरचा वापर फारच कमी होता. घाटगे-पाटलांकडे फर्ग्युसन ट्रॅक्टरची एजन्सी होती. त्या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात ट्रॅक्टरच्या वापराने खूप फरक पडला. एका अर्थाने शेती विकासाला घाटगे-पाटलांनी दिलेलं हे योगदान मानता येईल. " 22 मुंबईचे विनायक दीक्षित यांचा वसंतरावांशी खूप जुना परिचय होता. ते सांगत होते, "माझे वडील एस. आर. पुसाळकर अँड कंपनीत नोकरीला होते. मुंबईत क्लिअरिंग एजंट्सचं काम करणारी ही एकमेव मराठी माणसाची कंपनी होती. पुसाळकरांना मुलगा नव्हता व त्यांच्या पश्चात माझे वडीलच ही कंपनी चालवू लागले. कारखान्यासाठी आयात होणारा माल मुंबई बंदरात बोटीने येऊन दाखल होई. तो सोडवून घेणं ही फार किचकट प्रक्रिया होती. त्यासाठी उत्तम क्लिअरिंग एजंट आवश्यक होता. ते महत्त्वाचं काम आम्ही करायचो. त्यामुळे पुसाळकर व नंतर माझे उद्योगभरारी । १०७ ।