विश्वासाने खांद्यावर ठेवलेला हात नवीन उभारी द्यायचा. " पुण्याचे अजित कटकोळ आपल्या आठवणी सांगताना म्हणतात, “१९६६मध्ये मी घाटगे-पाटील ट्रान्सपोर्टमध्ये दाखल झालो व २००१ मध्ये निवृत्त झालो. त्यानंतरही २००६ ते २००९ ह्या काळात कन्सल्टंट म्हणून मी जीपीटीशी जोडलेला होतो. "ट्रकविक्री सुरू करताना आम्ही सर्वप्रथम हिंदुस्तान मोटर्सची एजन्सी घेतली होती. ते बेडफोर्ड ट्रक्स विकायचे. तेव्हा वापरात असलेले फोर्ड व शेवलेंचे ट्रक्स लोकांना अधिक परिचित होते. आमचे ट्रक्सही उत्तम चालतात हे दाखवून देण्यासाठी आम्ही सुरुवातीला स्वतःच कोल्हापूरहून मुंबईला अंडी न्य सुरुवात केली. एकदा 'अंडी उशीर झाल्यामुळे ट्रकमध्येच उबली आणि पिल्लं बाहेर आली! पण अशा आम्ही केलेल्या धाडसामुळेच हळूहळू लोकांचा आमच्या ट्रक्सवर विश्वास बसला. "टीव्हीएस ग्रुपची सदर्न रोडवेज हा आमचा आदर्श होता. आमची पॉलिसी स्वतःच्या मालकीचे ट्रक्स विकत घेण्याची होती. पुढे ह्या व्यवसायातला ट्रेंड बदलत गेला. भाड्याने ट्रक्स घ्यायची पद्धत सुरू झाली. ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (TCI) ही नव्याने सुरू झालेली कंपनी त्यातूनच खूप मोठी झाली. ट्रान्सपोर्ट धंद्यातल्या इतर अडचणीही पुढे खूप वाढल्या. पैसे खायचं प्रमाण खूप वाढलं. पूर्वी आमच्याकडून कोणीही पैसे मागत नसत. कारण आम्ही बेकायदेशीर काही करणार नाही व म्हणून लाचही देणार नाही, असा आमचा लौकिक होता. त्यातूनही कोणी आमची अडवणूक करायचा प्रयत्न केला, तर आम्ही अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊ; पण लाच देणार नाही, हे अधिकाऱ्यांना ठाऊक होतं. पुढे मात्र नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांच्या अपेक्षाही वाढत गेल्या. " पुण्याचे श्रीकांत पाटणकर म्हणतात, "माझे वडील कोल्हापूर येथे लेबर कोर्टात जज्ज असल्याने आम्ही कोल्हापुरात राहायचो व त्या वेळी माझा घाटगे-पाटील कंपनीशी प्रथम परिचय झाला. मी बीएस्सी व एलएलबी केलं. नंतर एमबीए करत असताना अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून घाटगे-पाटील ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये दोन महिने मी इंटर्नशिप केली. वसंतवैभव | १०६ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१०८
Appearance