Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वडीलही वसंतरावांचे जवळचे मित्र बनले. हेही वसंतरावांचं एक मोठं वैशिष्ट्य होतं; त्यांच्याशी तुमचा संबंध जरी व्यावसायिक कारणामुळे आला, तरी लवकरच ते तुम्हांला मित्र बनवत असत. त्यांचा स्वभावच तसा माणसं जोडणारा होता. ह्या मैत्रीतून घाटगे पाटलांना नवं नवं कामही मिळत गेलं. कारण क्लिअर करून घेतलेला आयात माल पुढे पाठवण्यासाठी कारखानदारांना किंवा आयातदारांना ट्रक्सची गरज पडायची. अशा वेळी पुसाळकर घाटगे-पाटलांचं नाव सुचवायचे. त्यातून अनेक नवी कामं घाटगे पाटलांना मिळत गेली. Over Dimension Cargo (ODC) ही घाटगे पाटील ट्रान्सपोर्टची स्पेशालिटी होती. "घाटगे-पाटील इंडस्ट्रीज् जेव्हा सुरू झाली त्या वेळी त्यांनी जर्मनीहून Kunkel Wagner ह्या कंपनीकडून फौंड्रीची काही महागडी मशिनरी मागवली होती. ती क्लिअर करून घेताना तीन-चार दिवस घाटगे व पाटील हे दोघेही मुंबईत येऊन राहिले होते व सगळ्या कामावर जातीने लक्ष ठेवून होते. त्यांच्या कामात ते किती वाकबगार होते हे त्या वेळी माझ्या लक्षात आलं. “वसंतरावांचा मुक्काम बहुतेकदा चर्चगेटला रित्झ हॉटेलात असे. तिथली चिकन टिक्का ही डिश अतिशय प्रख्यात होती; पण वसंतरावांनी त्यांना एकदा खास त्यांच्यासाठी म्हणून खिचडी-कढी करायला लावली! नेहमीचं गि-हाईक म्हणून त्यांनी ती केळीही. मग पुढेही हॉटेलने ती डिश मेनूमधे कायम केली. एक नवी मराठी डिश त्या बड्या हॉटेलात इंट्रोड्युस करायचं श्रेय वसंतरावांचं! “वसंतरावांना सिनेमे पाहण्याचा खूप शौक होता. शिवाय ते एकटे कधीच सिनेमाला जात नसत, नेहमी मोठा ग्रुप घेऊन जात. अगदी मी शाळेत असताना, म्हणजे साधारण १९६२-६३ साली, असाच एकदा त्यांच्याबरोबर The Parent Trap नावाचा वॉल्ट डिस्नेचा रंगीत सिनेमा बघितल्याचं मला स्पष्ट आठवतं. त्या वेळी तो खूप लोकप्रिय झाला होता. आम्ही २०-२५ जण होतो त्या वेळी. नंतर सगळ्यांना ते चर्चगेटच्या पुरोहित हॉटेलात जेवायलाही घेऊन गेले होते. तिथलं चांदीच्या थाळीतलं जेवण खूप प्रसिद्ध होतं. सिनेमा आणि त्यानंतर जेवण ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या अगदी ठरलेल्या होत्या. त्यांना क्रिकेटचीही अतोनात आवड. मॅच बघायलाही ते आम्हांला बरोबर घेऊन जात. त्यानंतरही जेवण हे ठरलेलं. “माझ्या वडलांचं नावही वसंतराव होतं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते होते. संघाच्या कार्याबद्दल वसंतरावांना आदर होता व वसंतवैभव । १०८ ।