Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कंपनीचे पुण्यात राहणारे एक निवृत्त अधिकारी मोहन शिंगटे म्हणतात, “१९७२मध्ये मी घाटगे-पाटील ट्रान्सपोर्टच्या पुणे शाखेत जॉईन झालो. त्या वेळी मुंबई - कोल्हापूर थेट रेल्वे नव्हती. घाटगेसाहेब खूपदा डेक्कन कीनने मुंबईहून रात्री सव्वा आठच्या सुमारास पुण्याला येत व त्यानंतर अर्ध्या तासाने सुटणाऱ्या सह्याद्री एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना होत. मी पुणे-कोल्हापूर प्रवासाचं तिकीट घेऊन त्यांना स्टेशनवर भेटत असे. काही वेळा त्यांच्यासाठी घरून डबादेखील घेऊन जायचो. ते घरगुती जेवण त्यांना आवडायचं. अमीर हॉटेलचं चिकन सँडविचदेखील त्यांना खूप आवडायचं. खूपदा मी ते त्यांच्यासाठी घेऊन जात असे. कधी त्यांना पुण्यात अधिक वेळ असला, तर आम्ही दोघं स्टेशनजवळच्या त्या अमीर हॉटेलात जेवायलाही जात असू. तेव्हा ते मला चांगलं खाऊ घालायचे. स्वतःच्या मुलासारखंच ते माझ्यावर प्रेम करत. माझ्या मुलाला लहानपणापासून हार्टचा प्रॉब्लेम होता. इलाजासाठी त्याला इंग्लंडला पाठवायची देखील त्यांची तयारी होती. दुर्दैवाने पुढे लौकरच तो निवर्तला. "विक्रीकलेचं त्यांचं ज्ञान प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेलं होतं. एखाद्याला ऑफिसात भेटायला जाताना काय काळजी घायची, कसं बसायचं, कसं बोलायचं, आपली बॉडी लँग्वेज कशी ठेवायची वगैरे गोष्टी ते मला सांगत. एखाद्याला काही भेटवस्तू द्यायची असेल, तर तीही ऑफिसात न देता त्यांच्या घरी नेऊन द्यावी ही त्यांचीच एक शिकवण. या व्यवसायात त्यांना आलेले अनुभव आम्हांला सांगून ते आमचं अनुभवविश्व समृद्ध करायचे, “एकदा पुण्याच्या श्रेयस हॉटेलात ते मुक्कामाला होते. गप्पा मा मारता त्यांना झोपायला रात्रीचा एक वाजला होता. मुंबईतलं त्यांचं महत्त्वाचं होतं आणि ते वेळेत उठतील की नाही, सकाळी नीट मुंबईला पोचतील की नाही, याची मलाच काळजी वाटत होती; पण पूर्वी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी पाचला ते मुंबईला रवाना झालेदेखील! वेळेचे ते अगदी पक्के होते आणि झोपायला कितीही उशीर झाला तरी दुसऱ्या दिवशीच्या आपल्या कामात कधीच कसर करत नसत. " ३८ वर्षं मी इथे नोकरी केली. पुण्यात शनिवारवाड्यामागे सकाळ कार्यालयाजवळ आमचं कार्यालय होतं. सीनिअर रिजनल मॅनेजर म्हणून मी निवृत्त झालो. मी कोल्हापूरला मीटिंगसाठी आल्यावर प्रत्येक वेळी ते माझ्या कुटुंबीयांची आपुलकीने चौकशी करत. त्यांनी प्रेमाने आणि उद्योगभरारी । १०५ ।