इतकं पिग आयर्न आमच्या कामासाठी उपलब्ध झालं. हे सारं घडू शकलं ते केवळ साहेबांच्या आउट ऑफ बॉक्स विचार करायच्या सवयीतून." एम. डी. जोशी हे वसंतरावांचे पर्सनल असिस्टंट, पीए. ते म्हणतात, “मी १९६४ साली गोव्याहून कोल्हापूरला आलो आणि घाटगे अँड पाटील कंपनीत राजाराम रोडवरच्या त्यांच्या कार्यालयात गेलो. घाटगेसाहेबांनीच माझा इंटरव्ह्यू घेतला आणि लगेचच मला स्टेनोग्राफर म्हणून नोकरी दिली. शोरूममध्ये तीन महिने काढल्यानंतर घाटगेसाहेबांनी मला घाटग-पाटील इंडस्ट्रीमध्ये नेलं. ती कंपनी नवीनच सुरू झाली होती, म्हणून साहेबांनी माझ्यावर अॅडमिनिस्ट्रेशनचीही जबाबदारी टाकली. सकाळी ठीक साडेनऊ वाजता ते उचगावच्या आमच्या फॅक्टरीत येत व आल्याआल्या सगळं ठीक चालू आहे ना, ठरवलेली कालची सगळी कामं पार पडली आहेत ना ह्याचा आढावा घेत. मला योग्य त्या सूचना देत. मग त्यांच्या इतर कामाला सुरुवात होई. “साहेबांचं इंग्रजी फार चांगलं होतं; पण डिक्टेशन देताना ते नेहमी सोपे शब्द वापरत. पत्र टाईप करून मी सहीसाठी त्यांच्याकडे नेल्यानंतर बहुतेक वेळा पत्र न वाचताच ते लगेच सही करून देत. ते म्हणत, ‘पत्र बरोबर टाइप झालं आहे की नाही हे पाहणं ही स्टेनोग्राफरची जबाबदारी आहे.' त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर टाकल्यावर मीही माझं काम खूप दक्षतापूर्वक व बिनचूक करत असे. त्यांच्याकडून मी मॅनेजमेंटची अनेक टेक्निक्स आत्मसात केली व मला जनरल मॅनेजरच्या लेव्हलचं ज्ञान मिळालं. आज माझी खूप चांगली प्रगती झाली आहे व ही केवळ घाटगेसाहेबांची कृपा आहे. “दुपारी ते घरी जेवायला जात व साधारण तीन वाजेपर्यंत पुन्हा फॅक्टरीत येत. साडेपाचच्या सुमारास घरी जायला निघत. स्वतः घरी जाताना 'तुमची घरी जायची सोय आहे ना?' असं मला न चुकता विचारत व काही सोय नसल्यास स्वतःच्या गाडीने मला शोरूमपर्यंत सोडत. मला ते अगदी वडलांप्रमाणे वाटत. माझ्या कुठल्याही अडचणीविषयी मी त्यांच्याशी मोकळेपणे बोलू शकत असे व तेही शक्य तेवढी मदत करत असत, अशा कर्तबगार आणि तरीही विनम्र माणसाच्या हाताखाली २४ वर्ष काम करायची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो,” वसंतवैभव | १०४ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१०६
Appearance