Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फुटायचा. इम्पोर्ट लायसन्स मिळवण्यासाठी दिल्लीला निदान तीन-चार चकरा माराव्या लागायच्या; तेव्हा कुठे ते मिळायचं. मग आता पिग आयर्नसाठी इम्पोर्ट लायसन्स कुठून आणणार? शिवाय पिग आयर्न जहाजातून आणावं लागणार. म्हणजेच त्याचा खूप मोठा लॉट खरेदी करायला लागणार. त्याला पैसे कुठून आणायचे? यावर घाटगेसाहेबांच्या सुपीक डोक्यातून एक मार्ग निघाला. वर्षभरासाठी लागेल एवढं पिग आयर्न इम्पोर्ट करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे लायसन्स मागितलं. ब्राझिलचं पिग आयर्न उत्तम दर्जाचं असतं, म्हणून त्यांच्या डीलरशी वाटाघाटी केल्या. एका वर्षाचं क्रेडिट त्यांच्याच बँकेकडून मिळवलं, पण पुढचा प्रश्न मोठा कठीण होता. एवढं पिग आयर्न मुंबईत आल्यावर त्यावर बसणाऱ्या ३५% कस्टम ड्युटीसाठी पैसे कुठून आणणार? आमची सगळ्या बँकांतली खाती आधीच ओव्हरड्राफ्टवर होती. आम्ही सगळे डोकं धरून बसलो. "दुसऱ्या दिवशी ऑफिसात आल्याआल्या घाटगेसाहेबांनी मला बोलावून घेतलं. म्हणाले, 'बाँडेड वेअरहाऊस म्हणजे काय ह्याचा लगेच अभ्यास कर.' आम्हांला हा शब्दही माहिती नव्हता; पण मग लगेच एक्साइज डिपार्टमेंटच्या लोकांशी चर्चा करून आम्ही त्या नियमांची माहिती मिळवली आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं, की ड्युटी न भरतासुद्धा आम्ही मुंबईहून माल क्लीअर करून कोल्हापुरात आणू शकतो; पण अट एकच असते, की हा माल आम्हांला एखाद्या बाँडेड वेअरहाऊसमध्ये ठेवावा लागतो व पुढे जसजसा तो लागेल, तसतशी तेवढी ड्युटी भरून आम्ही तो वापरासाठी बाहेर काढू शकतो; पण आम्हांला सर्वांत जवळचं बाँडेड वेअरहाऊस सांगलीला होतं. तिथून प्रत्येक वेळी माल कोण सोडवून आणणार? पण साहेबांची जिद्द मोठी होती. म्हणाले, 'आपल्या फॅक्टरीमध्येच आपण वेअरहाऊस का नाही बांधत?" मग लगेच दिल्लीला तीन-चकरा मारून आम्ही बाँडेड वेअरहाऊसचा परवाना मिळवला आणि आमच्या फॅक्टरीमध्येच ओपन ग्राउंडवर तारेचं कंपाउंड बांधून वेअरहाऊस बांधलं. हे सगळं मागवलेला माल जहाजाने मुंबईत पोचायच्या आत आम्ही पूर्ण केलं. पुढे मुंबईत माल आला, तेव्हा एक पैसाही ड्युटी न भरता आम्ही ते पिग आय फॅक्टरीत आणलं, बाँडेड वेअरहाऊसमध्ये ठेवलं आणि नंतर गरज लागेल, त्याप्रमाणे रोज पाच-दहा टन माल आम्ही ड्युटी भरून बाहेर काढत असू. अशाप्रकारे एक पैसाही अतिरिक्त खर्च न करता वर्षभर पुरेल उद्योगभरारी । १०३ ।