Jump to content

पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे याचे निर्णय घेण्यासाठीच नेता लागतो. पण तो नेता ग्रांथिक पद्धतीने हे निर्णय घेऊ शकत नाही. आपली राजकीय सोय कशात आहे, हे पाहून घोषणा करणारी मंडळी निवडणुका जिंकू शकतील, जातीय लढाया वाढवू शकतील, पण ते वर्गीय राजकारण पुढे नेऊ शकणार नाहीत. डॉ. लोहियांनी हा मुद्दाम अशा भाषेत मांडलेला आहे. ते म्हणतात : धर्म आणि जाती ही आपल्या देशात वरिष्ठ वर्गांनी सोयीने हाताळलेली हत्यारे आहेत. ही हत्यारे वापरली जाऊ लागली म्हणजे मागे कुठेतरी सर्वहारा वर्गाचे हितसंबंध गुंतलेले आहेत हे समजून घ्यावे.

एक भ्रम

समाजात असणाऱ्या जातिव्यवस्थेमुळे वर्गीय संघटन उभारता येत नाही. या अडचणीला उत्तर म्हणून कनिष्ठ जातींचे जातीय संघटन बळकट करावे आणि या जातवार संघटना वर्गीय राजकारणाच्यासाठी हाताळाव्यात, अशी भूमिका काही मंडळींच्या मनांत आहे. त्यांच्या मनात वर्ग-वर्ण समन्वयाचा हा अर्थ असतो. जातींच्या जातवार संघटना जातीवर विश्वास असणाऱ्यांना नीट हाताळता येणार नाहीत आणि जात मोडणाऱ्यांना मात्र या संघटना नीट हाताळता येतील, या भ्रमातून आपण जितके बाहेर पडू तितके बरे होईल. जातीयवादी भूमिकेतून आलेल्या एका मागणीला पाठिंबा देऊन आपण यंदा दहा हजार मते मिळवू शकतो, पण ती टिकवायची असतील तर दरवेळी परंपरावाद्यांना पाठिंबा देत बसण्याचा उद्योग करावा लागतो. आदिवासींच्यामध्ये जन्मभर ज्यांनी कार्य केले, ज्यांच्या शब्दाखातर आदिवासी जगायला अगर मरायला तयार होतो, अशा मंडळींचा अनुभव असा आहे की स्थितिवाद्यांनी एक आदिवासी हाती धरल्याबरोबर मतदान जन्मभर काम करण्याच्या विरोधी गेले आहे ! जातीय अहंता आणि धार्मिक परंपरा समाजवाद्यांना सहज नीट हाताळता येतील या भ्रमात समाजवाद्यांनी राहू नये. सर्व मध्यपूर्वेतील धर्मप्रधान राजकारणाला उचलून धरण्याचा

।३९