Jump to content

पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून सर्व शोषितांच्या बाजूने शोषकांच्या विरुद्ध आणि शोषण व्यवस्थेविरुद्ध असणारा हा लढा आहे. वर्ग लढा म्हणजे एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर स्वामित्व गाजवावे यासाठी चाललेला लढा नव्हे ! शोषक आणि शोषित यांच्यांत असणान्या लढयाचा हेतू आज जे शोषक आहेत त्यांना शोषित करावे आणि आज जे पिळवणूक होणारे आहेत त्यांना पिळवणूक करणारे करावे असा नसतो. वर्गलढ्याचा हेतू वर्गविहीन समाजरचना अस्तित्वात आणणे म्हणजे वर्गाचे अस्तित्व संपवणे हा असतो. हीच गोष्ट वर्णाविरुद्धच्या लढ्याची आहे. आज ज्या जाती-जमाती वरिष्ठ आहेत त्यांच्याविरुद्ध कनिष्ठ जाती-जमातीचा लढा हा आजच्या कनिष्ठ जाती उद्याच्या वरिष्ठ जाती करण्यासाठी म्हणून नसतो. जातिव्यवस्था संपवण्यासाठी म्हणून असतो. वर्ग-वर्ण समन्वयाचा लढा जाती आणि वर्ग संपवण्याचा लढा आहे, त्या टिकवण्याचा लढा नाही. हा लढा लढताना हे भान आपण कसे टिकवणार? हाच माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आपण तत्त्व चर्चेत जे कमावतो ते व्यवहारात गमावतो असा नित्याचा अनुभव आहे !

जात हा राजकीय शक्तीचा आधार

वरिष्ठ जमाती आणि कनिष्ठ जमाती असे जे वर्गीकरण आपण करतो ते स्थूलमानाने बरोबर असणारे वर्गीकरण आहे. समजा आपण दलितांच्या मधील एखादी चांभारांच्यासारखी जात घेतली तर आपल्याला असे आढळून येते की ही जात दलितांच्यामधील असूनही स्वातंत्र्योत्तर काळात त्यांच्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री व इतर नेते निर्माण झालेले आहेत. त्यामुळे वरिष्ठ मध्यमवर्गीय जीवनमान असणारे चांभार जमातीचे लोक आपण ठिकठिकाणी दाखव शकतो. पण एकूण चांभार जमात म्हणून आपण पाहू लागतो तर या जमातीचे नव्वद टक्के लोक अत्यंत कनिष्ठ व दरिद्री जीवनमान कंठित आहेत असे दिसून येते. हा नियम जसा एका दलित जातीच्या बाबतीत लागू पडतो तसा तो दुसऱ्या दलित जातीच्या बाबतीतही

२६।