पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/26

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपण वर्ण म्हणून करतो आहोत, हे जर मनाशी स्पष्ट नसेल तर अस्तित्वात असणाऱ्या जाती आपापले बळ जतन करीत अस्तित्वात नसणान्या वर्णांच्या विरुद्ध फक्त बोलके राजकारण करीत राहतील, असा धोका मला वाटतो.

सत्तेचा विटाळ नको

आपण परंपरागत समाजरचना मोडून नवी समता व न्याय यांवर आधारीत समाजरचना अस्तित्वात आणण्याच्या गोष्टी बोलती आहोत. त्याशिवाय आपण भांडवलशाही व जमीनदारी अर्थव्यवस्था निकालात काढून समाजवादी अर्थरचना आणण्याच्या गोष्टीही बोलतो आहोत. या दोन्ही बाबी करण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने असो वा सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने असो, सत्ता ताब्यात घेतली पाहिजे असे आपल्याला वाटते. राजसत्ता ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे हे आपल्याला मान्य आहे का ? अर्थरचना टिकवणे अगर बदलणे यात राजसत्ता निर्णायक महत्त्वाची आहे, असे आपण मानतो आहोत काय ? व्यक्तिश: मला सत्तेचे हे निर्णायक महत्त्व मान्य आहे. समाजवादी मंडळी मात्र सत्तेचे हे महत्त्व मान्य करण्यास टाळाटाळ करतात. अर्थशक्ती ही मूलभूत आहे, असे तत्त्व म्हणून म्हणायचे आणि दंडशक्ती मूलभूत आहे असे गृहीत धरून व्यवहार करायचा, यात काही सुसंगती आहे की यात काही विसंगती आहे ? याचा विचार समाजवाद्यांनी करायला पाहिजे. मी स्वत: राजसत्ता हे अर्थव्यवस्थेचेच एक व्यक्त रूप मानतो. म्हणून सत्ता ताब्यात घेण्याची भूमिका अर्थवाद्यांनी घ्यावी यात मला विसंगत काही वाटत नाही.

तत्त्वचर्चा व व्यवहार

वर्ग-वर्णसमन्वय या शब्दाच्या मागे अभिप्रेत असणारा आशय एकदा आपण मनाशी स्वच्छपणे नोंदवला पाहिजे. सर्व जनतेला किमान गरजांच्या पूर्ततेची हमी देणारी समाजव्यवस्था अस्तित्वात यावी

।२५